एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 12 एप्रिल 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- महाराष्ट्रातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, काही भागात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचेही संकेत
- महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 187 नवे रुग्ण तर 17 जणांचा मृत्यू ; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1761वर
- देशात कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजार पार, तर औरंगाबादमध्ये सारीच्या आजाराने आतापर्यंत 13 जणांचा बळी
- कोरोना संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आखली रणनीती; परिस्थिती वेगाने बदलत असल्याने सर्व राज्यांना सावध राहण्याच्या सूचना
- फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; कुणालाही ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी नाही, सरकारचं आवाहन; तर सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी सरकारकडून मार्गदर्शिका; नियम तोडल्यास कारवाई
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैशांचा तुटवडा, राज्य सरकारला कर्ज काढावं लागण्याची शक्यता, राज्याला 40 हजार कोटींचा महसुली तोटा
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तैनात असणाऱ्या मुंबईच्या ताज हॉटेलमधील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्यापासून संपूर्णपणे बंद राहणार, गर्दी वाढल्याने दाणामार्केटसह, मसालामार्केट बंद होणार
- आपली परंपरा ओढून घेण्याची नाही तर वाटून खाण्याची आहे, कोरोनाच्या संकटात एक भाकरी आपण सगळे मिळून खाऊ; माझा कट्ट्यावर सामजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं मत
- कोरोना विरोधातली लस सप्टेंबरपर्यंत तयार होण्याची शक्यता, ब्रिटनच्या शास्त्रज्ञ सारा गिल्बर्ट यांची माहितीच; पुढील दोन दिवसांत माणसांवर प्रयोग होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement