स्मार्ट बुलेटिन | 11 ऑगस्ट 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार की मुंबई पोलीस? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर संपूर्ण तपास मुंबईत करण्याच रिया चक्रवर्तीची मागणी
2. अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, 30 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी, तर उद्यापासून कॉलेजचा पसंतीक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरु होणार
3. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास कोकणवासियांना 13 ऑगस्टनंतरही एसटीने प्रवास करता येणार, मात्र राज्य सरकारकडून अंतिम निर्देश न आल्याने कोकणात जाणाऱ्याने रेल्वे रखडल्या
4. कोरोनाविरोधातील लढाईत मुंबई महापालिकेला मोठं यश, उत्तर मुंबईतील रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी घटली, दहिसर, बोरिवली, कांदिवलीत 10 हजार जण कोरोनामुक्त
5. राज्यभरात काल 9 हजार 181 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, दिवसभरात 6 हजार 711 रुग्णांना डिस्चार्ज
6. शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांची कामं पटापट होतात, ऑनलाईन बैठकीत शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, राष्ट्रवादी वरचढ होत असल्याची खंत
7. पावसाने ओढ दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील बळीराजा चिंतेत; टोमॅटो, मका सोयाबीन पिकं धोक्यात, तर पाणी टंचाईचंही सावट
8. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी, शस्त्रक्रियेआधी मुखर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
9. बेरुतमधील स्फोटानंतर आठवडाभरात सरकार पायउतार, लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांच्यासह सर्व मंत्र्यांचे राजीनामे
10. दीड वर्षात 500 पॉर्न वेबसाईट्सवर बंदी, 50 सायबर गुन्हेगार गजाआड, राष्ट्रवादीविरोधी मेसेज व्हायरल करणारे स्लीपर सेलही निशाण्यावर