स्मार्ट बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2021 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मनसेप्रमुख राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर राहणार, 2014 मधील टोलनाका तोडफोड प्रकरणी वॉरंट, सुनावणीनंतर राजकीय कार्यक्रमांना हजेरी
2. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं देशव्यापी चक्काजाम आंदोलन, राज्यातही विविध शहरात आंदोलन; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा आंदोलनाला पाठिंबा
3. मुंबईतील मानखुर्द परिसरात गोदामाला लागलेली भीषण आग आटोक्यात, मात्र कुलिंग ऑपरेशनसाठी आणखी अवधी लागणार
4. 2019 मध्ये कोरोनामुळे यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
5. खासदार इम्तियाज जलील यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर नियुक्ती, पाच दिवसांपूर्वी जलील यांच्याकडून वक्फ बोर्डावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप
6. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, 6 कार्याध्यक्ष आणि 10 उपाध्यक्षांची नेमणूक, विभागावर समतोल साधण्याचा प्रयत्न
7. मालेगावातील वऱ्हाडाच्या बसला गुजरातमध्ये भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
8. अंधश्रद्धेच्या नावाखाली 2 किलो सोनं पुरुन 25 लाख खर्च, मोहटादेवी देवस्थानमधील संबंधितांवर गुन्हा दाखल
9. तब्बल 18 महिन्यांनंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये 4G इंटरनेटसेवा सुरु होणार
10. आयपीएलच्या लिलावात यंदा अर्जुन तेंडुलकरवर लागणार फ्रँचाईझींची बोली, लिलावासाठी बीसीसीआयकडे नावाची नोंद























