एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 29 जुलै 2019 | सोमवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- कर्नाटकात येडियुरप्पा सरकराची आज बहुमत चाचणी, 17 आमदार अपात्र ठरवल्यानंतर भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा
- उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी अपघातात जखमी, आई, काकूंचा मृत्यू, वकील जखमी आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरवर कटाचा आरोप
- मराठवाडा, विदर्भातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर, सरकारच्या दफ्तर दिरंगाईचा बळीराजाला फटका, 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार
- सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्र्यांसह, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पवारांना टोला
- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर मोची आणि मुस्लिम समाजाची दावेदारी
- नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा हादरा, सर्व नगरसेवक भाजपच्या गळाला लागणार, आमदार संदीप नाईकही भाजपच्या वाटेवर
- फसवणूक केल्यानं ट्रक ड्रायव्हरला मालकाकडून अमानूष मारहाण, उलटा टांगून अमानवी छळ, नागपूरच्या वडधामना परिसरातील धक्कादायक प्रकार
- मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिवसैनिकाची हत्या, वाढदिवसाच्या पार्टीत नितेश सावंतचा खून, 3 जण ताब्यात
- नाट्यरसिकांच्या गलथानपणामुळे अभिनेता सुबोध भावे संतापला, फेसबुकवरुन नाटकात काम न करण्याचा इशारा, प्रेक्षकांकडून होणाऱ्या मोबाईल वापरावर टीका
- खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंह आणि धावपटू द्युती चंद आऊट, दिलेल्या मुदतीत अर्ज क्रीडा मंत्रालयाकडे दाखल न झाल्याने नाव यादीतून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement