Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 ऑगस्ट 2021 रविवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 ऑगस्ट 2021 रविवार | ABP Majha
1. राज्यात शनीवारी 7, 467 रुग्णांना डिस्चार्ज, 6,959 नव्या कोरोना रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
2. महाराष्ट्रात 'झिका'ची एन्ट्री, पुण्यातील पुरंदरच्या बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडला, शेजारच्या गावांना सतर्कतेचा इशारा
3. वेळ आली तर सेनाभवन फोडू, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं खळबळजनक वक्तव्य, वक्तव्याचा विपर्यास केल्याची नंतर सारवासारव
4. क्रांतीदिनी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक, आंदोलनाची दिशा 9 ऑगस्टला ठरवणार, खासदार संभाजीराजेंची माहिती
5. मुंबईतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार, आज मुख्यमंत्री आणि पवारांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा
6. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास, समाजकारणात कायम सक्रिय राहण्याची इच्छा
7. आजपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार, रिझर्व्ह बँकेचे नवे नियम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरासाठी अधिक पैसे मोजावे लागणार
8. मुंबईच्या गोरेगावात भरधाव कारची डिव्हायडरला धडक, काही वेळासाठी वाहतुकीचा खोळंबा, अपघातग्रस्त कारवर खासदाराचं स्टिकर असल्यानं चर्चा
9. अमरावतीतला वडाळी तलाव बनला आकर्षणाचा केंद्रबिंदू, तलावात सगळीकडे कमळाची बहार, राज्य राखीव पोलीस दलाची मेहनत कामाला
10. महिला थाळी फेक स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर फायनलमध्ये, भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत तर पीव्ही सिंधूचा कांस्यपदकासाठी सामना