(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 ऑगस्ट 2021 शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 ऑगस्ट 2021 शुक्रवार | ABP Majha
1. सामना हरला पण मन जिंकलं, भारतीय महिला हॉकी संघाचे कास्यपदक थोडक्यात हुकलं, ब्रिटनकडून 4-3 असा पराभव, कुस्तीपटू सीमा बिस्ला पराभूत तर बजरंग पुनिया उपांत्यपूर्व फेरीत दाखल
2. जबाबदारीचं भान ठेवून लोकलबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, लोकलप्रवासाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे हायकोर्टाचे आदेश
3. विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त एकट्या सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नगरमधला प्रादुर्भावही कायम
4. पुण्यातल्या निर्बंधांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या उपस्थितीत आज होणारी आढावा बैठक रद्द ,नाराज व्यापाऱ्यांचं दुसऱ्या दिवशीही असहकार आंदोलन कायम
5. राज्यातील महाविद्यालयं येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत प्रत्यक्ष सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार, मंत्री उदय सामंत यांची माहिती
6. राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागातील 'त्या' अधिकाऱ्यांच्या इस्रायल दौऱ्याची चौकशी करा, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घेणार जगभरातल्या भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांची बेठक, निर्यात 400 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं ध्येय
8. पूर्वलक्षी प्रभावाने लागू असलेला कर कायदा रद्द होणार; संसदेत केयर्न-व्होडाफोन प्रकरणी कर मागे घेण्यासाठी केंद्र सरकारचे विधेयक सादर
9. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आज राज ठाकरेंची भेट घेणार, मुंबई महापालिकेत भाजप आणि मनसेची युती होणार का याकडे सर्वांचं लक्ष
10. अन्यथा आम्ही महापालिकाच विसर्जित करण्याचे निर्देश देऊ, वसई-विरार महापालिका हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांवरून हायकोर्टानं पालिकेला फटकारलं