एक्स्प्लोर
'एबीपी माझा'ची दशकपूर्ती, प्रेक्षकांच्या विश्वासपूर्तीचा 'माझा'ला अभिमान!
मुंबई: दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तुमच्या सर्वांच्याच साक्षीनं एबीपी समूहानं मराठी पत्रकारितेत पाय ठेवलं. आणि बघता-बघता महाराष्ट्राच्या घरा-घरात ''उघडा डोळे, बघा नीट'' या ब्रीदवाक्यानं पोहोचलेलं एबीपी माझा लोकप्रिय झालं.
त्याच तुमच्या लाडक्या चॅनलची आज दशकपूर्ती होत आहे. या १० वर्षात ‘माझा’नं प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक घटकाची बाजू मांडत लोकशाही प्रक्रियेतील आपली भूमिका अधिकाधिक दृढ केली. पण या प्रक्रियेत आम्ही केवळ माध्यममात्र होतो.
आमची भूमिका निभावण्याची संधी तुमच्या विश्वासामुळे आम्हाला लाभली. खरं तर त्या विश्वासाचीच ही दशकपूर्ती आहे. हे नातं पुढेही असंच कायम राहून काळाच्या रेषेवर उत्तरोत्तर अधिक घट्ट होईल, यात आम्हाला तिळमात्र शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement