एक्स्प्लोर
चाकण-शिक्रापूर मार्गावर अपघात, तिघांचा मृत्यू
चाकण : चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दुचाकीला मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
मृतात पती हणमंत ठाकर, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. हणमंत ठाकर हे दुचाकीवरून शिक्रापूरला निघाले असता स्पीड ब्रेकर आल्याने त्यांनी ब्रेक लगावला. मात्र मागून आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले.
चाकण-शिक्रापूर हा मोठ्या वाहनांची वर्दळ असणारा रस्ता आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement