एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिंदखेड राजामध्ये तब्बल 258 इंग्रजकालीन चांदीची नाणी सापडली!
सिंदखेड राजा येथे इंग्रजकालीन 258 चांदीची नाणी सापडली आहेत. सदर नाण्यांची बाजारभावाने सध्याची किंमत 1 लाख रुपये आहे.
बुलडाणा (सिंदखेड राजा) : सिंदखेड राजा येथे इंग्रजकालीन 258 चांदीची नाणी सापडली आहेत. सदर नाण्यांची बाजारभावाने सध्याची किंमत 1 लाख रुपये आहे. हा गोष्टीची माहिती मिळताच प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी जाऊन ही नाणी आपल्या ताब्यात घेतली.
सोमवारपेठ भागात विलास टाक आणि चिमण देशमाने यांच्या मालकीची जमीन आहे. याठिकाणी नवीन बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना ही नाणी सापडली.
याठिकाणी जेसीबीनं खोदकाम सुरु होतं. त्यावेळी अचानक काही नाणी तेथील कामगारांना दिसली. एक-दोन नव्हे तर तब्बल 258 चांदीची नाणी असल्याचं समजाच ती पाहण्यासाठी स्थानिकांनी तिथं बरीच गर्दी केली. दरम्यान, स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच ही नाणी आपल्या ताब्यता घेतली. सध्या याबाबत अधिक तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement