एक्स्प्लोर
Advertisement
हरिश्चंद्रगडावर 20 ट्रेकर्स अडकले, सुटका करण्याचे प्रयत्न सुरू
अंधार पडल्याने सध्या तरी कोकणकडा येथे या अडकलेल्या 20 ट्रेकर्सना रात्र काढावी लागणार आहे. याठिकाणी त्यांना प्रामुख्याने थंडीचा सामना करावा लागेल त्यांच्याकडे पुरेशी पांघरुणे नाहीत असे अडवाणी यांनी माहिती देतांना सांगितले आहे.
ठाणे : कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले असता तेथून पुढे दीड किलोमीटरवर असणाऱ्या कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने वाचविण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार आणि पोलीस यांना देखील यासंदर्भात समन्वय ठेऊन ट्रेकर्सची सुटका करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
अंधार पडल्याने सध्या तरी कोकणकडा येथे या अडकलेल्या 20 ट्रेकर्सना रात्र काढावी लागणार आहे. याठिकाणी त्यांना प्रामुख्याने थंडीचा सामना करावा लागेल त्यांच्याकडे पुरेशी पांघरुणे नाहीत असे अडवाणी यांनी माहिती देतांना सांगितले आहे.
जिल्हा प्रशासन या ट्रेकर्सचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सातत्याने त्यांच्या तसेच नगर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून ठाण्याहूनही काही ट्रेकर्सची मदत घेतली जात आहे. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी देखील बचावाच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत
डॉ अडवाणी यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत. कोकणकडापासून खाली 1000 फूटावर ते अडकून पडले आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन पाठवण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांनादेखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement