एक्स्प्लोर
लातूरमध्ये दोन सख्या जावांचा विहरीत बुडून मृत्यू
लातूर: लातूरच्या माळेगावात पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या जावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. शेतात काम करतांना पिण्यासाठी पाणी घ्यायला या दोन्ही विहीरीवर गेल्या. पाणी काढत असताना शेळीचं पिलू त्यांच्या पायात अडकलं आणि तोल जाऊन त्या विहीरीत पडल्या.
जवळपास कोणीच नसल्यानं त्यांच्या मदतीच्या हाका कोणी ऐकल्याच नाहीत आणि विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरापर्यंत या दोघी घरी परतल्या नसल्यानं त्यांचा शोध सुरू झाला. त्यांच्या काही वस्तू विहिरीजवळ आढळल्यानंतर या घटनेचा तपास लागला.
आज दोघीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement