![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेत 15 ठराव!
कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यात 15 ठराव मांडण्यात आले आहेत राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
![कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेत 15 ठराव! 15 Resolutions in the Maratha Samaj Round Table Conference in Kolhapur कोल्हापुरातील मराठा समाज गोलमेज परिषदेत 15 ठराव!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/23200023/Maratha-Samaj-Golmej-Parishad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरात गोलमेज परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये राज्यभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे, मेगा भरतीला स्थगिती द्यावी यासह 15 ठराव या गोलमेज परिषदेत मांडण्यात आले आहेत.
राज्यभरातील मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेत मांडण्यात आलेल्या 15 ठरावावर यावर चर्चा केली जात आहे. तसंच सरकारने योग्य पावलं उचलली नाहीत, तर याच परिषदेत 48 खासदार आणि 181 मराठा आमदारांचे पुतळे जाळण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गोलमेज परिषदेत कोणते ठराव मांडले?
1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे
2. मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा
3. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा
4. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी
5. सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी
6. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी
7. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी
8. मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे
9. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी
10. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे
11. स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी
12. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे
13. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी
14. कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी
15. राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)