ABP Majha Exclusive : अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू, संसद प्रकरणातील अमोल शिंदेंच्या पालकांचा इशारा
Parliament Security Breach Case : आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं, माझं पोरगं परत नाही आले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिली आहे.
मुंबई: अमोलने जे काही केलं ते बेरोजगारीच्या कारणामुळं केलं, त्याने सैन्य भरतीचे सहा वेळा प्रयत्न केले होते आणि त्याने रनिंगची चँमिपयनशिपही जिंकली आहे अशी माहिती अमोल शिंदेच्या (Amol Shinde) पालकांनी दिली आहे. अमोलशी आमचं बोलणं करून द्या अन्यथा आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.
गुणवत्ता असून ही मुलास नोकरी नाही मिळाली. रोजगारी करणाऱ्या लोकांच्या मुलास नोकरी लागत नाही का असा प्रश्न धनराज शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मुलाशी बोलणे नाही झाल्यास मी आत्महत्या करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
बुधवारी संसदेची सुरक्षा (Parliament Security Breach Case) भेदून चार युवक आतमध्ये गेले, त्यातील दोघांनी लोकसभेमध्ये जाऊन धूर सोडला. दोन तरूणांनी संसद परिसरात धुमाकूळ घातला. त्यानंतर या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील आहे.
काय म्हणाले अमोल शिंदेचे आई-वडील?
अमोल शिंदेच्या आई वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, अमोलने दिल्लीला जाण्याआधी विहीर खोदण्याचे काम केले. त्यातून पाच हजार मजुरी मिळवली. दोन हजार उसणे घेतले. आणि ते घेवून तो 9 तारखेला दिल्लीसाठी निघाला होता. दोन दिवस मजूर म्हणून काम करून लातूरला गेला. तिथे जाऊन भगतसिंह यांचा फोटो विकत घेतला होता. भगत सिंह आणि इतरांचे फोटो असलेला बनियन विकत घेतले. तेच घालून तो संसदेत गेला होता.
पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. आम्ही नवरा बायको दोघेही काम करतोय. त्याला वेळोवळी पैसे दिले होते. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं. माझं पोरगं वापस नाही आले तर मी आत्महत्या करणार असल्याचा इशारा अमोलचे वडील धनराज शिंदे यांनी दिली आहे.
लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींपैकी अमोल धनराज शिंदे याचा देखील समावेश आहे. अमोल हा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातल्या झरी या गावात राहतो. दरम्यान अमोल शिंदेचे आई-वडील मजुरी करतात. तर, अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत होता. ही घटना समोर आल्यावर अमोल शिंदे याच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झडती घेत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेमुळे पोलीस व गुप्तचर यंत्रणेने सतर्क होऊन तपास सुरू केला आहे.
अमोलच्या कुटुंबाची पार्श्वभूमी
अमोल शिंदे याचे वडील गावच्या खंडोबा मंदिरात झाडलोट करतात. तर आई मिळेल ते मजुरीचे करते. अमोलला दोन भाऊ आहेत. एक मंदिराच्या शिखराचे काम करतो. दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर, अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नव्हती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अमोल सतत दिल्लीला जात असल्याचे देखील समोर येत आहे.
धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम
अमोलचे गावातच शिक्षण झाले. त्याचा स्वभाव शांत आणि चांगला आहे. दररोज कामाला जाणाऱ्या आई-वडिलांना देखील तो मदत करायचा. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी सराव करतांना अमोल नेहमी धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम यायचा असे त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले. मात्र, त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेकांना प्रश्न पडला असून, या घटनेने त्यांना धक्का देखील बसला आहे.
भगतसिंह विचाराने प्रभावित
व्यायाम ची आणि धावण्याची आवड असणारा अमोल रोज सकाळी प्रक्तीस करत होता...धावणे...लांब उडी...उंच उडी गोळा फेक यांचा रोज सराव करत होता..यासाठी घरची परस्थिती नसताना ही त्याच्या आ ई वडिलांनी व्याजाने पैसे काढून साहित्य घेऊन दिले होते. त्यासाठी अमोल स्वतः ही कामावर जात असे. भगतसिंह यांचा फोटो, टी-शर्ट त्याकडे असणारच. तसेच भगतसिंह यांच्या वर आधारित असणारे अनेक पुस्तके वाचण्याचा आणि गोळा करण्याचा काम ही अमोलने केले होते.
ही बातमी वाचा: