एक्स्प्लोर

अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प

लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादने निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे.

लातूर : जगाचं लक्ष लागलेल्या इराण(Iran) आणि इस्रायल–अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद जागतिक व्यापारावर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका निर्यातीला बसत असून निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही बसत असल्याचे दिसून येते. जळगावातील केळी, तर नाशिकमधील द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. दुसरीकडे लातूरमधील व्यापारी बाजारपेठेलाही याचा फटका बसला आहे. लातूरच्या (Latur) व्यापाऱ्यांचा माल इराण आणि मुंबई बंदरात अडकल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. 

लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादने निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा माल इराण आणि मुंबई येथील बंदरात अडकून पडला आहे. लातूर येथील व्यापारी श्रीहरी काल्या हे गेल्या चार वर्षांपासून सोयाबीन डीओसी, कबुली चणा आणि मका यांसारख्या कृषी उत्पादनांची निर्यात करीत आहेत. मुंबईतील न्हावा शेवा बंदर येथून जलमार्गे माल इराणमधील सर्वात मोठ्या बंदर अब्बास बंदर येथे पाठवला जातो. त्यानंतर तेथून रस्तेमार्गे माल अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला रवाना केला जातो . आजमीतिला ही सर्व यंत्रणा ठप्प पडली आहे.

250 टन माल इराणमध्ये अडकला

सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे बंदर अब्बास येथे सुमारे २५० टन निर्यात माल अडकून पडला आहे. इराणमधील परिस्थितीमुळे आयातदारांनी अद्याप हा माल उचललेला नाही.

800 टन माल न्हावा शेवा येथे थांबला

त्याचबरोबर न्हावा शेवा बंदरावर सुमारे 800 टन माल गोदामात अडकून आहे. पुढील वाहतुकीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. लातूरमधील फॅक्टरीत आणखी 175 टन माल निर्यातीसाठी तयार असून तोही सध्या थांबवण्यात आला आहे.

पेमेंट अडकल्याने आर्थिक ताण

बंदरात अडकलेला माल ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नसल्याने आम्हाला पेमेंटही मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती श्रीहरी काल्या यांनी दिली.

राज्यातील इतर निर्यातदारही अडचणीत

आखाती देशांना निर्यात करणाऱ्या राज्यातील अनेक निर्यातदारांची परिस्थिती याचप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक संघर्षाचा थेट परिणाम लातूरसारख्या जिल्ह्यातील उद्योगांवर होत असल्याने व्यापारी वर्गात सध्या चिंतेचे वातावरण आहे, असे श्रीहरी काल्या यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

हेही वाचा

इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget