Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
ज्या राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, तेच आता एका फलकावर झळकू लागले आहेत. कोल्हापूर शहरातील व्हीनस काॅर्नर आणि दसरा चौकात फलक लावण्यात आले आहेत.
Rajesh Kshirsagar : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार विरोधात बंडाळी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन 40 शिवसेना आमदार मिळाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी शिवसेना आमदार आणि नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचाही समावेश होता.
तीन आमदारांनी बंड केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांमध्ये चांगला संताप व्यक्त करण्यात आला. या तिन्ही आमदारांच्या घरावर तसेच कार्यालयावर शिवसैनिकांनी एल्गार करताना मोर्चा नेत आपला संताप व्यक्त केला. राजेश क्षीरसागर यांनी 2019 मध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांनी सर्वस्व पणाला लावूनही उमेदवारी मिळाली नाही. राजेश क्षीरसागर यांनी 2019 मध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपविरोधात चांगलाच एल्गार पुकारला होता. चंद्रकांतदादांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता, इतकेच नव्हे दादांच्या वक्तव्याची आठवण करून हिमालयात पाठवून देण्याची भाषा केली होती.
मात्र, आता तेच राजेश क्षीरसागर शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ज्या राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या, तेच आता एका फलकावर झळकू लागले आहेत. कोल्हापूर शहरातील व्हीनस काॅर्नर आणि दसरा चौकात फलक लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे हे फलक आहेत. या फलकांवर आता चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांचे एकत्रित फोटो आहेत. सोबतीला आनंद दिघेही यांचा फोटोही आहे. तसेच स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे फोटो आहेत.
बंडखोर शिंदे गट आणि भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आता त्याचे परिणाम आता स्थानिक राजकीय पातळीवर दिसू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना-भाजपमधील संघर्ष टोकाला गेला होता. इतकचं नव्हे भाजप शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू असल्याचे म्हटले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच आपला पराभव केला, पाठीत खंजीर खुपसला, त्यांना हिमालयमध्ये पाठवल्या शिवाय राहणार नाही अशा प्रकारचे आव्हानही आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून देण्यात आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या