(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांचं यावेळी नेमकं काय ठरलंय? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पहिल्यांदाच केला स्पष्ट खुलासा!
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक शिंदे गटात सामील होण्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. ते नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह शिवसेनेचे लक्ष लागून राहिले आहे.
Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील होण्यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. ते नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह शिवसेनेचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, काल संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हमिदवाडा कारखाना कार्यस्थळावर पार पडला. या ठिकाणी बहुतांश कार्यकर्त्यांनी शिंदे गटाकडे जाण्याचा आग्रह धरला. सत्तेच्या बाजूने असेल, तर आपल्याला विकासकामे करून निधी खेचून आणता येईल अशा प्रकारची भूमिका या मेळाव्यामध्ये मांडण्यात आली. या मेळाव्यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक दिल्लीमध्ये लेबर कमिटीच्या बैठकीत निमित्ताने दिल्लीमध्ये होते. त्यामुळे या मेळाव्याला ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी आता या मेळाव्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय मंडलिंक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चार पाच दिवसांपूर्वी लेबर कमिटीच्या निमित्तानं दिल्लीत आलो आहे. तेव्हा काही खासदारांनी मला शिंदे गटाच्या बाजूने येण्याची विनंती केली, पण कार्यकर्त्यांची भूमिका ऐकल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही. शिंदे गटासोबत जावं असा कार्यकर्त्यांचा निरोप आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व खासदारांशी साधकबाधक चर्चा करून मी निर्णय घेणार आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग पहिल्यांदा कोल्हापुरातच झाला होता हे खरं आहे, पण सत्तेचा फायदा शिवसेना पेक्षा आमच्या मित्रांना अधिक झाला. ज्यांच्या विरोधात मी लढलो ते दुसऱ्या बाजूने आहेत. त्यांचं काय होणार याचा विचार करावा लागेल. उद्धव साहेब हे मला माझ्या भावाप्रमाणे आहेत. विस्कटलेलं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आहे, पण दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. मातोश्री किंवा कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी अद्याप बोलण्याचा प्रयत्न केलेला नाही.
इतर महत्त्वाच्या महत्वाच्या
- Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
- Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षात सुरुंग!
- Rajesh Kshirsagar : कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप