एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

KDCC ED raid : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची ईडीकडून सुटका

KDCC ED raid : कोल्हापूर जिल्हा बँकेतील ईडीच्या छापेमारीनंतर पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या अधिकाऱ्यांना शुक्रवारी उशिरा सोडून देण्यात आलं आहे.

KDCC ED raid : कोल्हापूर जिल्हा बँकेतील ईडीच्या छापेमारीनंतर पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या अधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री उशिरा सोडून देण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या (ED) पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आलं होतं. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले होते. 

मुश्रीफ यांची सत्ता असलेल्या (Hasan Mushrif ED Raid) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशीमधील आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील शाखेत ईडीने छापेमारी केली होती. छापेमारीनंतर तिन्ही शाखेतील कागदपत्रांचे बाॅक्स झेराॅक्स काढून आपल्यासोबत नेले आहेत. 11 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या छापेमारीचं काय झालं? हा प्रश्न अनुत्तरित असतानाच या कारवाईतून नेमकी कोणती माहिती हाती लागली याबाबत कोणतीही माहिती ईडीकडून अद्याप सादर करण्यात आलेली नाही.

ईडीकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती 

ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना ईडीने सोडल्यानंतर ते आज कोल्हापुरात पोहोचतील. या अधिकाऱ्यांवर छापेमारीपासून ते कालच्या मुंबईतील चौकशीतही मुश्रीफांच्या निगडीत प्रश्नांची सरबत्ती केल्याचे समजते. मुश्रीफांच्या  संदर्भातील माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याची चर्चा बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. कर्मचाऱ्यांना अतिशय अपमानास्पद वागवल्याचे बँक कर्मचारी सांगत आहेत. मुश्रीफ यांच्या संदर्भात कागदपत्रे दाखवण्यासाठी सातत्याने ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात होता, अशीही माहिती समोर येत आहे. 

अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बँकेतील अधिकारी सुनील लाड यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ईडीकडून 30 तास चौकशी सुरू असताना लाड बँकेत कार्यरत होते. दरम्यान, ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला होता. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार  @abpmajhatvABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सEknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्तीEknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून पुरलं; 10 महिन्यांनी थेट जंगलात सांगाडाच सापडला
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Embed widget