एक्स्प्लोर

Sanjay Mandlik : संजय मंडलिकांना 2019 मध्ये कोणत्या मतदारसंघातून किती मते? आता कोणता मतदारसंघ निर्णायक ठरणार?

कोल्हापूरमधील दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असं स्वप्न पाहणारे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले होते. कोल्हापूर संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी झाले होते.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात असल्याने जोरदार चुरस आहे. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय मंडलिक महाराजांविरोधात रिंगणात आहेत. संजय मंडलिक आणि हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली आहे. दुसरीकडे, शाहू महाराजांचा महाविकास आघाडीकडून ताकदीने प्रचार सुरु आहे. 

2019 मध्ये काय घडले होते?

कोल्हापूरमधील दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असं स्वप्न पाहणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले होते. कोल्हापूर संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही खासदारांनी शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. दुसरीकडे, आमचं ठरलंय म्हणत संजय मंडलिक यांच्या विजयासाठी सतेज पाटील यांची यंत्रणा संपूर्ण राबली होती. त्यामुळे धनंजय महाडिक यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाला होता.

गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेल्याने राजकीय संदर्भ बदलले गेले आहेत. महाडिक यांनी भाजपत प्रवेश राज्यसभेवर खासदार आहेत, तर संजय मंडलिक शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. 

मंडलिकांना 2019 मध्ये कोणत्या मतदारसंघात किती मतदान 

  • चंदगड विधानसभा 120857
  • राधानगरी भुदरगड - 126160 
  • कागल - 148727 
  • कोल्हापूर दक्षिण - 127175 
  • करवीर - 120864 
  • कोल्हापूर उत्तर - 101892

कोल्हापूर दक्षिण, उत्तर, करवीरमध्ये आव्हान 

2019 मध्ये संजय मंडलिक यांना मिळालेल्या मतांमध्ये सतेज पाटलांच्या ताकदीचा सुद्धा मोठा वाटा होता. आज कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर असे तिन्ही काँग्रेस आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये शाहू महाराजांचा प्रचंड पभाव आणि सतेज पाटील यांचीही ताकद असल्याने संजय मंडलिक यांना ताकद लावावी लागणार आहे. या तिन्ही मतदारसंघात साडे दहा लाखांवर मतदार आहेत. मंडलिक यांना 2019 मध्ये कोल्हापूर उत्तरमधून सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते.

कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार असून मंडलिक यांचाही गड समजला जातो. समरजितसिंह घाटगे यांची सुद्धा ताकद आहे. चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील आमदार आहेत. त्यामुळे 2019 मध्ये घेतलेल मताधिक्य कायम राखण्याचे आव्हान मंडलिकांसमोर असेल. 

मुख्यमंत्र्यांची समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या सभेनंतरही शनिवार रात्री कोल्हापूरमध्ये उशीरापर्यंत जोडण्या लावल्या होत्या. नेत्यांशी चर्चा करत मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली होती. भाजप नेते आणि हसन मुश्रीफ यांच्याशी कट्टर राजकीय वैर असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यासोबत त्यांनी बंद खोलीत जवळपास पाऊणतास चर्चा केली होती. यामागे कागलमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये नाराजी राहू नये यासाठी आटोकाट प्रयत्न होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Anjali Damania On Beed Police : बीड पोलीस, आरोपीच्या पिंजऱ्यात; दमानियांच्या रडारवर बालाजी तांदळेTeam India Win | भारतीय संघाने उडवला पाकचा धुव्वा, क्रिकेटप्रेमींचा मोठा उत्साह IND VS PAKSpecial Report Neelam Gorhe On Uddhav Thackeray : साहित्याचा मंच आरोपांची मर्सिडीज; 'एका पदासाठी दोन मर्सिडीज'Special Report Karntak ST Bus : एसटीला 'ब्रेक', सीमाभागातील प्रवाशांचे हाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Embed widget