एक्स्प्लोर

राज्यपालांचे मराठवाड्यातील कार्यक्रम उधळून लावा; मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत ठराव

Maratha Kranti Morcha: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठवाड्यात होणारे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावण्याच्या ठरावासहित एकूण 15 ठराव घेण्यात आले. 

Maratha Reservation Golmej Parishad: मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) जालना जिल्ह्याच्यावतीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढणाऱ्या राज्यातील विविध संघटना, अभ्यासक व सामान्य कार्यकर्ता आदी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे (Maratha Reservation Golmej Parishad) आज आयोजन करण्यात आले होते. शहरातील मातोश्री लॉन्स येथे आयोजन करण्यात आलेली गोलमेज परिषद सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे मराठवाड्यात होणारे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावण्याच्या ठरावासहित एकूण 15 ठराव घेण्यात आले. 

महत्वाचे ठराव...

  • यापुढे मराठवाडयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कुठेही कार्यक्रम होत असल्यास, त्याचा सदनशीर मार्गाने विरोध करून कार्यक्रम उधळून लावण्यात यावा. 
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे. 
  • सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिकेसाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रुटी दूर करून आवश्यक पद्धतीने सरकार दरबारी प्रयत्न करून ही याचिका सकारात्मक पद्धतीने निकाली काढावी. 
  • छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील,यांचा अपमान करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. 
  • भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करावी. त्यांनी मराठा समन्वयाकामध्ये वाद लावण्याचे काम केले असून, गेल्या 4  महिन्यात त्यांनी एकही बैठक घेतली नाही.
  • राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी. 
  • राज्यपाल जातील तिथे बंद पाळला जाईल... 

राज्यपालांच्या विरोधात ठराव...

जालना येथे झालेल्या गोलमेज परिषदेत राज्यपालांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वादग्रस्त विधानांच निषेध करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली. सोबतच यापुढे मराठवाड्यात जिथे-जिथे राज्यपाल यांचा कार्यक्रम असेल तिथे त्यांचा कार्यक्रम लोकशाही पद्धतीने सदनशीर मार्गाने विरोध करून उधळण्यात येईल. तसेच ते ज्याठिकाणी जाणार असतील त्या ठिकाणी बंद पाळून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचा ठराव घेण्यात आला असल्याची माहित देखील  मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली आहे. 

चंद्रकांत पाटीलांची हकालपट्टी करा! 

दरम्यान याचवेळी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात देखील ठराव मांडण्यात आला आहे. गेल्यावेळीच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. त्या काळात देखील त्यांनी आश्वासन देण्याशिवाय काहीच केले नाही. तसेच त्यांनी मराठा समन्वयाकामध्ये वाद लावण्याचे काम केले. आत्ता देखील ते मराठा आरक्षण उपसमितीचीचे अध्यक्ष आहेत, पण त्यांच्याकडून बैठका घेतल्या जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव आज सर्वांच्यामते घेण्यात आला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget