Facts: तुम्ही कधी उंचावरून पडण्याचं स्वप्न पाहिलंय का? या स्वप्नामागे असतात विशिष्ट कारणं; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
Facts: पडण्याशी संबंधित कोणतेही स्वप्न चिंता आणि स्वतःवरील नियंत्रण सुटत असल्याच्या भावनांना दर्शवते असं म्हटलं जातं.
Sleep Facts: बहुतेक लोक रात्री झोपताना स्वप्न पाहतात. काही लोकांना चांगली स्वप्न पडतात, तर काहींना वाईट आणि भीतीदायक स्वप्न पडतात. काही लोकांना वारंवार उंचावरून पडत असल्याची स्वप्न (Dream of falling from height) पडतात. तुम्हीही अनेक वेळा पलंगावरुन, डोंगरावरुन किंवा इमारतीवरून पडण्याचं स्वप्न पाहिलं असेल. तुम्हाला माहित आहे का? की पडण्याशी संबंधित या स्वप्नांमागे एक सत्य आहे, जे बहुतेक लोकांना माहित नाही. बहुतेकांना वाटत असतं की हे फक्त एक स्वप्न आहे. पण या स्वप्नांचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे हेही अगदी खरं.
असं म्हटलं जातं की पडण्याशी संबंधित कोणतंही स्वप्न हे तुम्हाला वाटत असणारी चिंता किंवा स्वतःवरील नियंत्रण गमावण्याच्या भीतीशी संबंधित असतं. हे तुमच्या करिअरशी संबंधित असू शकतं, नातेसंबंधाशी संबंधित असू शकतें किंवा आर्थिक परिस्थितीशी संबंधित असू शकतं. स्वप्न तज्ज्ञांच्या मते, पडण्याचं स्वप्न असहाय्यतेच्या भावनेशी संबंधित असू शकतं. उंचावरुन पडत असल्याची स्वप्न भीती, घाबरणं आणि तणावाचे संकेत देतात. याशिवाय, स्वप्नात तुम्ही जिथून पडत आहात त्याचेही वेगवेगळे अर्थ असू शकतात.
1. कड्यावरून पडणं
जर तुम्ही कड्यावरुन पडण्याचं स्वप्न पाहत असाल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजीत आहात. अशा प्रकारची स्वप्नं सहसा जास्त दिसतात जेव्हा एखाद्याशी असलेली मैत्री किंवा खोल नातं तुटलेलं असतं, जे पुन्हा जोडणं अशक्य आहे.
2. अडखळून पडण्याची स्वप्नं
स्वप्नात अडखळण्याचा अर्थ असा आहे की, काहीतरी मागे राहिलं आहे किंवा तुमच्याकडून मागे सोडलं जात आहे, जे तुम्ही मागे सोडू इच्छित नाही.
3. आकाशातून पडणं
आकाशातून खाली पडण्याचं स्वप्न हे नियंत्रण गमावण्याच्या भावनेशी संबंधित आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की, आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप अस्वस्थ आहात आणि तुम्हाला आतून तुटल्याची भावना वाटत आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यात मोठ्या बदलातून जात असाल तेव्हा हे स्वप्न तुम्हाला पडू शकतं.
4. लिफ्टमधून पडणं
जेव्हा जीवनात अचानक बदल होतो, तेव्हा एखादी व्यक्ती अनेकदा पडण्याची स्वप्नं पाहते. पण हे सगळ्यांसोबत व्हायला हवं असं आवश्यक नाही. स्वाभिमान गमावणं किंवा एखाद्या गोष्टीवरील नियंत्रण गमावणं यासारख्या चिंतेने ग्रस्त असलेल्या काही लोकांना अशी काही स्वप्नं पडू शकतात.
टीप: या लेखात नमूद केलेल्या बाबी माहितीसाठी आहे. एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
हेही वाचा:
Health Tips: रात्री झोपताना अस्वस्थ वाटतं? शांत झोप लागण्यासाठी करा 'या' गोष्टी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )