Farmer Protest : शेतकरी आंदोलनाबाबत सचिननंतर विराट, रोहित, अजिंक्यचीही प्रतिक्रिया, म्हणाले...
शेतकरी आंदोलनाचा प्रश्न जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध करण्यात येत आहे.भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे.
मुंबई : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. काल (मंगळवारी) गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी ट्वीट केल्यानंतर #IndiaTogether हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे.
कर्णधार विराट कोहली म्हणाला, या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.
Let us all stay united in this hour of disagreements. Farmers are an integral part of our country and I'm sure an amicable solution will be found between all parties to bring about peace and move forward together. #IndiaTogether
— Virat Kohli (@imVkohli) February 3, 2021
रोहित शर्माने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची कायम महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू.
एकजूटीने कोणत्याही समस्येवर तोडगा निघतो. त्यामुळे एकजूटीने राहू आणि आपले अंतर्गत प्रश्न सोडवू.
संबंधित बातम्या :There’s no issue that cannot be resolved if we stand together as one. Let’s remain united and work towards resolving our internal issues #IndiaTogether
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021