Vande Bharat Train : दक्षिण भारतातल्या पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
New Vande Bharat Train : पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरु येथे 'वंदे भारत एक्सप्रेस' आणि 'भारत गौरव काशी दर्शन' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि अनेक उपक्रमांचे लोकार्पण केलं.
![Vande Bharat Train : दक्षिण भारतातल्या पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण Vande Bharat Train PM Modi Flag off South India First Chennai Mysore Express Train Vande Bharat Train : दक्षिण भारतातल्या पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/11/68b4786f9134af707ec212d276d449e2166814643245925_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi Bengaluru Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'वंदे भारत एक्सप्रेस' ( Vande Bharat Express ) आणि 'भारत गौरव काशी दर्शन' ट्रेनला ( Bharat Gaurav Kashi Darshan Train ) हिरवा झेंडा दाखवला आणि अनेक उपाययोजनांचं लोकार्पण केलं. पंतप्रधान मोदी सध्या बंगळुरी दौऱ्यावर असून तेथे हा कार्यक्रम पार पडला आहे. 'भारत गौरव काशी दर्शन' ट्रेन 'भारत गौरव' योजनेअंतर्गत कर्नाटकच्या धर्मादाय विभागाकडून चालवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दक्षिण भारतातील (Southern States) चार राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त आज पंतप्रधान बंगळुरु येथे आहेत.
'वंदे भारत एक्सप्रेस' आणि 'भारत गौरव काशी दर्शन' ट्रेनला हिरवा झेंडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रांतिवीर संगोली रायण्णा म्हणजेच केएसआर रेल्वे स्टेशनवर ( KSR Railway Station ) पोहोचून मैसूर-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ही देशातील पाचवी आणि दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. ही ट्रेन चेन्नई-बेंगलुरु-मैसूर (Chennai-Bengaluru-Mysuru) या मार्गावर चालवण्यात येईल. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला ही हिरवा झेंडा दाखवला.
PM Modi flags off Vande Bharat Express, Bharat Gaurav Kashi Darshan Train in Bengaluru
— ANI Digital (@ani_digital) November 11, 2022
Read @ANI Story | https://t.co/6OuzFZJ3mm#PMModi #bengaluru #VandeBharatExpress #BharatGauravKashiDarshan pic.twitter.com/SidjjCx38U
पंतप्रधान दोन दिवसीय दक्षिण भारत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी बेंगळुरूच्या एचएएल विमानतळावर पोहोचले. येथे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, अनेक मंत्रिमंडळ सदस्य, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, भाजप नेते येडियुरप्पा तसेच पक्षाचे आमदार आणि अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
'भारत गौरव काशी दर्शन' ट्रेनने करा काशी दर्शन
पंतप्रधान मोदी यांनी आज बंगळुरूमधील केएसआर रेल्वे स्थानकावर भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भारत गौरव योजनेअंतर्गत ही ट्रेन चालवणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे, यामध्ये कर्नाटकातील यात्रेकरूंना काशी दर्शन घडवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी एकत्रित योजना आखली आहे.
Karnataka | Prime Minister Narendra Modi flags off Bharat Gaurav Kashi Darshana Train at KSR railway station in Bengaluru.
— ANI (@ANI) November 11, 2022
(Source: DD) pic.twitter.com/qFdukr7JRJ
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 चे उद्घाटन करणार
यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 चं उद्घाटन पार पडणार आहे. हे टर्मिनल बांधण्यासाठी सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च आला आहे. या टर्मिनल-2 च्या उद्घाटनानंतर विमानतळावरील प्रवाशांची क्षमता वार्षिक पाच ते सहा कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या प्रवाशांची क्षमता अडीच कोटी वार्षिक आहे.
चार राज्यांसाठी 25 हजार कोटींच्या योजना
पंतप्रधान मोदी शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसीय दक्षिण भारत दौऱ्यावर आहेत. चार राज्यांच्या या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध योजनांचं लोकार्पण करण्यात येणार आहे. चार राज्यांसाठी 25 हजार कोटींच्या योजनांचं अनावरण करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)