(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unlock 5 Guidelines Released : केंद्राकडून शाळा, चित्रपटगृह, स्विमींग पूल सुरू करण्यास परवानगी, मात्र..
Unlock 5 Guidelines Released : केंद्राकडून अनलॉक पाचची घोषणा करण्यात आली आहे. Unlock 5 मध्ये शाळा, चित्रपटगृह, स्विमींग पूल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या गोष्टी राज्याच्या परवानगीनंतरचं लागू करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. सोबतचं खेळाडूंसाठी स्विमिंग पूल उघडण्यास देखील केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे.
गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे, की 15 ऑक्टोबरनंतर शाळा आणि कोचिंग संस्था उघडण्याबाबत राज्य सरकारे निर्णय घेऊ शकता. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे.
15 ऑक्टोबर कंपन्यांच्या स्तरावर आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम घेण्यास गृहमंत्रालयाने संमती दिली आहे. यासाठी मानक संचालन प्रक्रिया व्यावसायिक विभाग लवकरचं नियमावली जाहीर करणार आहे.
Govt of India issues new guidelines for 'Re-opening'; cinema halls/ multiplexes/ swimming pools used for training of sportspersons/entertainment parks to re-open from 15th October pic.twitter.com/ZUubvggLR3
— ANI (@ANI) September 30, 2020
राज्याच्याही गाईडलाईन्स जारी
राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
काय आहे राज्याच्या अनलॉक 5 मध्ये? अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार काय बंद राहणार? शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क Maharashtra Unlock-5 | राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार