Unlock 5 | पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी; हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरु होणार
Unlock 5 Full Guidelines : पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
काय आहे अनलॉक 5 मध्ये?
- अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
- राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
- डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
- मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
- पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार
काय बंद राहणार? शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क
मध्य रेल्वे लागली कामाला
राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढल्या नंतर मध्य रेल्वे लागली कामाला. महाराष्ट्रातील इंटरसिटी एक्सप्रेस देखील सुरू होणार, त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्सप्रेस, यांच्यासह, मुंबई नागपूर, मुंबई सोलापूर, मुंबई अमरावती, मुंबई कोल्हापूर, मुंबई औरंगाबाद, सर्व महत्वाच्या एक्सप्रेस सुरू होणार. मात्र, त्याससाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने थेट पत्र न लिहिता, आदेश जारी केले, हे आदेश विनंती पत्र मानून रेल्वे सुरू करण्यासाठी आवश्यक ते काम करण्यास सुरुवात.
या रेल्वे सुरू होण्याआधी.. आधी राज्य सरकारच्या आदेशानुसार कोणकोणत्या ट्रेन सुरू कराव्या लागतील त्याची लिस्ट बनवली जाईल, ही लिस्ट फायनल झाली की मग ती रेल्वे बोर्डाकडे पाठवली जाईल, रेल्वेबोर्डला काही शंका असतील तर ते मुख्य सचिवांना विचारून त्या निस्तारतील मग मध्य रेल्वेला तसे सविस्तर आदेश दिले जातील, आणि त्यानुसार इंटरसिटी एक्सप्रेस सुरू होतील.Maharashtra Unlock-5 | राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार