(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smriti Irani | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, "माझा कोविड 19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे." संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची तपासणी करावी. स्मृती इराणी ह्या बिहार निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होत्या.
It is rare for me to search for words while making an announcement; hence here’s me keeping it simple — I’ve tested positive for #COVID and would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest ????
— Smriti Z Irani (@smritiirani) October 28, 2020
यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, अर्जुन मेघवाल यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका दिवसात 43,893 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर देशात संक्रमितांची संख्या वाढून 79,90,322 झाले आहेत. तर दिवसभरात 508 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. परिणामी एकूण मृतांची संख्या 1,20,010 इतकी झाली आहे.
देशात आतापर्यंत 72,59,509 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून रिकव्हर होण्याचा दर 90.85 टक्के इतका वाढला आहे. तर कोरोना संक्रमणामुळे होणारा मृत्यू दर 1.50 टक्के इतका कमी झाला आहे.