Delta Plus : डेल्टा प्लस व्हेरिएंट 'चिंताजनक' घोषित, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळला केंद्र सरकारचा अलर्ट
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण राज्यातील रत्नागिरी आणि जळगाव या ठिकाणी सापडले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (Variant of Concern)म्हणजे चिंताजनक व्हेरिएंट घोषित केलं आहे.
नवी दिल्ली : देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रसारामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा मोठा हातभार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर आता कुठे नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट (Variant of Concern) जाहीर केलं आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) June 22, 2021
Union Health Ministry advises Maharashtra, Kerala and Madhya Pradesh on Delta Plus Variant of #COVID19, a Variant of Concern (VOC).https://t.co/ONugd9Fg4g @PMOIndia @drharshvardhan @AshwiniKChoubey @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB @DDNewslive
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट केलं जात आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात अॅन्टिबॉडी तयार होतात हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं.
जगातील जवळपास 80 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचं समोर आलं आहे. आता भारताचाही त्यात समावेश झाला आहे. भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, जपान,पोलंड, नेपाळ आणि रशियातही या प्रकारचे रुग्ण सापडले आहेत.
महाराष्ट्रात 21 रुग्ण
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील 9 रुग्ण रत्नागिरीत, जळगावमध्ये 7, मुंबईत 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण : परिवहन मंत्री अनिल परबांना दिलासा, नाशकात असा गुन्हाच घडला नाही, पोलिसांची क्लिन चीट
- Gold Silver Price Today : सोने 100 रुपयांनी घसरले तर चांदी 200 रुपयांनी वधारली, जाणून घ्या आजचे भाव
- वसईच्या तरुणीला सोशल मिडियावरील मैत्री भोवली, सूड भावनेतून मित्रानं संबंध शहरालाच धरलं वेठीस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या