(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वसईच्या तरुणीला सोशल मिडियावरील मैत्री भोवली, सूड भावनेतून मित्रानं संबंध शहरालाच धरलं वेठीस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोशल मीडियावरुन भेटलेल्या या दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र ही मैत्री कालांतराने तरुणीसाठी डोकेदुखी ठरली. अखरे तरुणीनं ही मैत्री तोडली. पण पठ्ठ्यानं तिला त्रास देण्यासाठी अख्या वसईलाच वेठीस धरलं.
मुंबई : सध्या सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. सोशल मीडियाचे अनेक सदुपयोग आहेत. पण सोशल मीडियाचा योग्य पद्धतीनं वापर केला नाही, तर सोशल मीडिया डोकेदुखीही ठरु शकते. असाच काहीसा प्रत्यय आलाय वसईत राहणाऱ्या तरुणीला. या तरुणीला दिल्लीच्या तरुणांशी मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडियामधून झालेली मैत्री तरुणीला त्रासदायक ठरली आहे. अखेर तिनं या तरुणाशी मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला, पण ही मैत्री तिला चांगलीच भोवली.
सोशल मीडियावरुन भेटलेल्या या दोघांमध्ये मैत्री झाली. मात्र ही मैत्री कालांतराने तरुणीसाठी डोकेदुखी ठरली. अखरे तरुणीनं ही मैत्री तोडली. पण पठ्ठ्यानं तिला त्रास देण्यासाठी अख्या वसईलाच वेठीस धरलं. वसईत राहणाऱ्या एका तरुणीनं दिल्लीत राहणाऱ्या रमन हजारेलाल होरा यांच्याशी सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. तरुणी त्याच्याशी केवळ मैत्रीच्या नात्यानेच चॅट करायची पण हा पट्टया कमालीची सिरीअस झाला. त्यानंतर तो तरुणीला सतत टॉर्चर करु लागला. अखेर तरुणीनं त्याला ब्लॉक केलं. मग संतापलेल्या या आरोपीने फेसबुक आणि इन्साग्रामवर अंकाउंट बनवून, त्याने वसईतील लोकांशी मैत्री केली आणि त्या मुलीची बदनामी करायला सुरुवात केली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यांने तरुणीच्या नावाने सोशल मिडियावर फेक अंकाउंट बनवून वसईतील काहींशी मैत्री करुन तरुणीची बदनामी केली. तरुणीची संपूर्ण माहितीही काढली. त्याच माहितीच्या आधारे तो तिच्या आसपासच्या हॉटेल्सना फोन करुन दिवसातून दोन ते तीन वेळा खाण्याच्या ऑर्डर तिच्या पत्त्यावर पाठवायचा. एसी, टिव्ही रिपेअरवाला, मसाजवाला यांना ही तो फोन करुन तरुणीच्या घरच्या पत्त्यावर पाठवायचा. या फेक ऑर्डरमुळे तरुणीबरोबर येथील व्यावसायिकही हैराण झाले होते. शेवटी तरुणीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. माणिकपूर पोलिसांनी दिल्लीतून आरोपीच्या मुसक्या आवळून, त्याला अटक केली.
दरम्यान, दिल्लीतून अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं. वसई न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे जर आपण सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करता तर थोडं सावध रहा. नाहीतर प्रकरण चांगलंच भोवू शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :