एक्स्प्लोर

Corona New Strain | भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री, ब्रिटनहून परतलेल्या सहा जणांमध्ये नवीन जिनोम आढळला

भारताची चिंता काहीशी वाढवणारी बातमी आहे. देशात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. ब्रिटनहून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवा जिनोम आढळल्याचं तपासणीत समोर आलं आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. विशेष म्हणजे सध्यातरी  एकही रुग्ण महाराष्ट्रातील नसून  देशाच्या अन्य भागातील आहे. सहापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि चेन्नईतील रुग्णाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेले हे सहा जण यूकेमध्ये आढळलेल्या सार्स कोवि-2 च्या नवे स्ट्रेनने संक्रमित आहेत.

या सहा जणांना स्वतंत्र खोलीत आयसोलेट केलं आहे. संबंधित राज्य सरकारांनी तयार केलेल्या विलगीकरण कक्षात त्यांना ठेवलं आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारन्टीन करण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांची माहिती घेतली जात आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर, अनेक देशांच्या विमानसेवा स्थगित 

25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर दरम्यान, जवळपास 33 हजार प्रवासी यूकेहून भारताच्या विविध विमानतळावर पोहोचले. या सर्व प्रवाशांचा राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आरटी-पीसीआर चाचणी करुन त्यांची नोंद ठेवली जात आहे. आतापर्यंत 114 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने देशातील ही दहा प्रयोगशाळांमध्ये (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरु, एआयएमएचएएनएस बंगळुरु, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) पाठवण्यात आले आहेत. माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसाचा नवा स्ट्रेन 70 टक्के वेगाने परसतो. त्यामुळे याबाबत अतिशय सतर्कता बाळगली आहे, असं वैज्ञानिकांनी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल सांगितलं होतं. ज्या कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा लसीच्या निर्मितीवर परिणाम होणार नाही.

COVID-19 New Strain: नव्या कोरोना विषाणू संदर्भात WHO ब्रिटनच्या संपर्कात; लवकरचं चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती

भारताकडून हवाई वाहतुकीवर बंदी ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावलं उचलत 23 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत यूकेवरुन येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या नमुन्यांची जीनोम सीक्वेन्सिंग तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची माहिती मिळाल्यानंतर नॅशनल टास्क फोर्सने बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.

Coronavirus | ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीय आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

या देशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सुरुवात ब्रिटनमधून झाली होती. यानंतर यूरोपातील अनेक देशांमध्ये नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार, डेन्मार्क, नेदरलॅण्ड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत.

संबंधित बातम्या

New Coronavirus | भारतात नव्या विषाणूचा शिरकाव; ब्रिटनहून परतलेल्या 6 जणांना नव्या स्ट्रेनची लागण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget