एक्स्प्लोर

जाणून घ्या कोणत्या राष्ट्रांमध्ये पसरलीये Coronavirus च्या नव्या प्रकाराची दहशत

कोरोनाचा नवा प्रकार अधिक घातक मानला जाण्याचं कारण म्हणजे या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण हे जवळपास 70 टक्के वेगानं आणि अधिक प्रमाणात होण्याची माहिती अभ्यासकांकडून देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये (Coronavirus) कोरोनाच्या (New variant) नव्या तीन प्रकारांची पडताळणी झाल्यामुळं साऱ्या जगावर असणारं हे संकट आणखी बळावतानाचं चित्र आणि त्याचीच दहशत सर्वत्र पाहायला मिळत आहे. युकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा प्रकार अधिक घातक मानला जाण्याचं कारण म्हणजे या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण हे जवळपास 70 टक्के वेगानं आणि अधिक प्रमाणात होण्याची माहिती अभ्यासकांकडून देण्यात येत आहे.

कोरोनाच्या या नव्या प्रकारची सर्वप्रथम माहिती युकेमधून 14 डिसेंबरला जाहीर करण्यात आली होती. ज्याला VUI-202012/01 असं नाव देण्यात आलं. यावर अद्यापही संशोधन सुरुच आहे. असं म्हटलं जात आहे की, सप्टेंबर महिन्यातच हा नवा प्रकार आकारास आला असावा.

501.V2 या नावाचा वॅरिएंट हा दक्षिण आफ्रिकेतील संसर्गजन्य रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला. 24 डिसेंबरला आफ्रिकेच्या disease control body च्या प्रमुखपदी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नायजेरियामध्ये कोविडचा आणखी एक नवा प्रकार P681H आढळला. पण, याचा संसर्ग झपाट्यानं होण्याचं प्रमाण मात्र तुलनेनं कमी असल्याचं कळत आहे.

ऑस्ट्रेलिया

21 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युकेमधून परतलेल्या दोन जणांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यांच्या माध्यमातून देशात नवा प्रकार पोहोचला आहे.

डेन्मार्क

जागतिक आरोग्य संघटनेनं डेन्मार्कमध्यो कोरोनाच्या नव्या 9 रुग्णांची माहिती समोर आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं.

कॅनडा

26 डिसेंबरला इथं कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली.

फ्रान्स

ब्रिटनहून परतलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली असून, त्यात हा नवा प्रकार आढळल्याची माहिती 25 डिसेंबरला फ्रान्सकडून देण्यात आली. या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. त्यामुळं त्याला स्वगृही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

इटली

23 डिसेंबरला कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झालेला दुसरा रुग्ण इटलीच्या अॅन्कोनामध्ये आढळला. पण, या रुग्णाचा युकेशी कोणताही थेट संपर्क आला नव्हता. आता अशीही माहिती देण्यात येत आहे की युकेमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला नव्हता.

जपान

युकेहून परतलेल्या 5 प्रवाशांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याची बाब 25 डिसेंबरला जपानमधून समोर आली.

लेबनॉन

देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लंडनहून परतलेल्या विमानातून आलेल्या प्रवाशांमार्फत इथंही कोरोनाचा नवा प्रकार पोहोचला. परिणामी देशात आलेल्या अशा प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नेदरलँड्स

आरोग्य मंत्र्यांनी 24 डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार युकेमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार इथं अॅम्सटरडॅममध्ये संक्रमित झालेल्या 2 रुग्णांमध्ये दिसून आला आहे.

नायजेरिया

24 डिसेंबरला नायजेरियाच्या आरोग्य विभाग प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या नव्या प्रकाराचा उदय हा नायजेरियामध्ये झाला होता. ऑगस्ट 3 आणि ऑक्टोबर 9 या दिवशी घेण्यात आलेल्या नमुन्यांपैकी दोन रुग्णांच्या नमुन्यांत हा प्रकार आढळून आला.

स्पेन

स्पेननध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचे चार रुग्ण आढळून आले, ज्यांचा युके प्रवासाशी थेट संबंध होता. अजूनही 3 रुग्णांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या 501.V2 या कोरोनाच्या नव्या वॅरिएंटनं आरोग्य विभागाची भीती आणखी वाढवली आहे. पहिल्या सर्व प्रकारांपेक्षा हा नवा प्रकार अधिक प्रमाणआत झपाट्यानं संसर्ग पसरवत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

स्वीडन

युकेहून परतल्यानंतर प्रकृती बिघडल्याच्या तक्रारीनंतर इथं एका प्रवाशाला कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. यानंतर मात्र इतर कोणालाही याचा संसर्ग झाल्याचं वृत्त नाही.

युनायटेड किंग्डम

14 डिसेंबरला युकेचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं कोरोनाच्या नव्या प्रकारचा संसर्ग झालेले 1000हून अधिक रुग्ण आढळले आहेत. पुढं 23 डिसेंबरला कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार इथं आढळून आला. ज्या रुग्णांचा संबंध दक्षिण आफ्रिकेती ल कोरोना प्रकाराशी जोडण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget