एक्स्प्लोर
तीन वर्षांनंतर मोदी-शाह आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत उद्या (सोमवार) एनडीए पक्षांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार हे जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर म्हणजे जवळपास मे 2014 नंतर तीन वर्षांनी उद्धव ठाकरे मोदी-शाहांना दिल्लीत भेटतील. याआधी दोनवेळा उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन गेले, मात्र तेव्हा ते केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनाच भेटले होते.
दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवन इथे संध्याकाळी साडे सहा वाजता ही बैठक होणार आहे. निमित्त यूपीच्या विजयाचं असलं तरी राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार आहे.
दिल्लीत येऊनही उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना न भेटणं हे शिवसेना-भाजपमधल्या वाढत्या तणावाचंच लक्षण होतं. याआधी एनडीएचं सरकार असताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी कधी मुंबईत आले तर ते आवर्जून मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घ्यायचे. पण मोदी-शाहांच्या युगात चित्र बदलत गेलं.
मुंबईत मोदी आल्यावरही कधी मातोश्रीकडे फिरकले नाहीत. या दोघांची शेवटची मुंबईतली भेट ही शिवस्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच व्यासपीठावर झाली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली भेटीला जास्त महत्व प्राप्त झालं आहे.
मोदी आणि उद्धव ठाकरेंची किमान काही सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी भेट झाली. पण उद्धव ठाकरे आणि अमित शाह हे तर तब्बल तीन वर्षांनी आमने-सामने असतील.
महाराष्ट्रात एकत्रित सत्तेत असूनही मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेतले मतभेद शिगेला पोहोचले होते. अगदी अफझलखानाच्या टोळ्या वगैरे शेलकी विशेषणंही अमित शाहांसाठी वापरण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता या भेटीनंतर शिवसेना-भाजपमधलं वातावरण कितपत निवळतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement