'या' लोकांना 9 महिने पूर्ण होण्यापूर्वीच दिला जाऊ शकतो बूस्टर डोस
Coronavirus Vaccination: परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय बुस्टर डोसशी संबंधित आहे.
Coronavirus Vaccination: परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय बुस्टर डोसशी संबंधित आहे. सूत्रांनुसार, NTAGI ने शिफारस केली आहे की, परदेशात जाणारे लोक गरजेनुसार नऊ महिन्यांच्या अंतरापूर्वी कोविड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.
सूत्रांनी पुढे सांगितले की, सर्वांसाठी बूस्टर डोस अंतर कमी करण्यासाठी कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. भारतात बूस्टर डोस गॅप कमी करायचं की नाही, यावर तज्ज्ञांचे संमिश्र मत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी भारत सरकारची परवानगी असूनही, बूस्टर डोस घेण्यास कमी लोकांनी स्वारस्य दाखवले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) कोविड-19 नॅशनल टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते, प्राथमिक लसीकरण आणि कोविड-19 संसर्गाविरूद्धचा तिसरा डोस यामधील अंतर जितके जास्त असेल तितकी शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहील. ते म्हणाले की, आम्ही पाहिले आहे की लाभार्थ्याला दिलेला दुसरा डोस अगदी अलीकडेच देण्यात आला आहे. जर आता तिसर्या डोस दिला. तर त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्यांची प्रतिकारशक्ती आधीपासूनच मजबूत असेल. खाजगी लसीकरण केंद्रांद्वारे 18+ लोकसंख्येसाठी बूस्टर डोस 10 एप्रिल 2022 रोजी सुरू झाला आहे. हे सर्व ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि दुसर्या डोसनंतर 9 महिने पूर्ण झाले आहेत ते या डोससाठी पात्र आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- WHO On Covid Death: कोरोनामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यावर केंद्र सरकारचा आक्षेप
- भररस्त्यात मेहुण्याचा तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, प्रेम विवाह केल्याच्या रागातून हत्या
- Power Crisis : कोळसा संकट अधिक गडद; 20 दिवसांसाठी 1100 हून अधिक ट्रेन रद्द करण्याचा निर्णय
- Vasant More : पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलोय, वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट