एक्स्प्लोर

Israel vs Iran Conflict: आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी

Israel vs Iran Conflict: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

Israel vs Iran Conflict: गेल्या चार दिवसांपासून अमेरिका–इस्रायल आणि इराण (US Israel vs Iran War) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवर उमटू लागले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. तर महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री काही प्रवासी सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. मात्र, अजून देखील अनेक प्रवासी दुबईसह आखाती देशात अडकलेले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाकडून अडकलेल्या नागरिकांना परत भारत आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः विविध यंत्रणांशी नियमित संवाद साधत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. मदतीसाठी अडकलेल्या प्रवाशांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आले आहे.  

Israel vs Iran Conflict: मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्कात

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने 'एक्स'वर माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. 

Israel vs Iran Conflict: व्हॉटसॲप क्रमांक जारी

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 

व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357  

आणखी वाचा 

Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran Conflict: आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी
आखाती देशात महाराष्ट्रातील नागरिक अडकले; देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, गिरीश महाजनांकडे सोपवली मोठी जबाबदारी
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळून, नेमके काय होते आरोप? 
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा, अंजली दमानियांचे सर्वच आरोप लोकायुक्तांनी लावले फेटाळून, नेमके काय होते आरोप? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
Embed widget