एक्स्प्लोर

Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?

Dharashiv Crime News: घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमी झाले आहेत.

धाराशिव: धाराशिवमध्ये कालाकेंद्रत पुन्हा मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. चोराखळी येथील कला केंद्रावर शस्त्र दरोड्याची थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कालिका सांस्कृतिक कला केंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी दरोडा टाकला, पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल  9 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण तिघेजण जखमी झाले आहेत.(Dharashiv Crime News)

तर निर्मला जाधव यांनी येरमाळा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार आणि महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर येत-जात करत होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते.(Dharashiv Crime News)

रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या आणि चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचं त्यांना जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात शिरले. त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. 

आरडाओरड केल्याने आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी निर्मला जाधव, रेखा शिंदे यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही, असं तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला सदरील प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. फिर्यादीच्या तक्रारी वरून सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपी व महादेव घुलेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे, या घटनेत कला केंद्र चालक निर्मला जाधव ,रेखा शिंदे, गळ्या गंगावणे या तिघांना मारहाण झाली आहे, तर तिघेजण जखमी झाले आहेत. घटनेने धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायर फुटून गाडी थेट हॉटेलमध्ये, चहा पिणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू, धाराशिवमध्ये भीषण अपघात
टायर फुटून गाडी थेट हॉटेलमध्ये, चहा पिणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू, धाराशिवमध्ये भीषण अपघात
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! चुलत्यानेच 13 महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले, धाराशिव हादरलं, आरोपीला अटक 
धक्कादायक! चुलत्यानेच 13 महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले, धाराशिव हादरलं, आरोपीला अटक 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget