(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Union Territory of Ladakh : केंद्र सरकारची लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा; लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली
मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे अमित शाह म्हणाले.
श्रीनगर : केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या X खात्यावर लिहिले की, हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ लोकांना देणे सोपे होणार आहे. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरपूर संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
In pursuit of PM Shri @narendramodi Ji's vision to build a developed and prosperous Ladakh, the MHA has decided to create five new districts in the union territory. The new districts, namely Zanskar, Drass, Sham, Nubra and Changthang, will take the benefits meant for the people…
— Amit Shah (@AmitShah) August 26, 2024
5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. यानंतर लडाख हा केंद्रशासित प्रदेश बनला. दुसरा केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आहे. पाच वर्षांपूर्वी याच दिवशी तत्कालीन राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.
इतर महत्वाच्या बातम्या