एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा लष्करी तळावर ग्रेनेडनं हल्ला
जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल (सोमवार) रात्री दहशतवाद्यांनी पुलवामा सेक्टरमधल्या काकापोरा इथल्या सैन्याच्या तळावर ग्रेनेडने हल्ला केला.
![जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा लष्करी तळावर ग्रेनेडनं हल्ला Terrorists lob grenade at an Army camp in Pulwama latest update जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांचा लष्करी तळावर ग्रेनेडनं हल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/06074735/jammu1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल (सोमवार) रात्री दहशतवाद्यांनी पुलवामा सेक्टरमधल्या काकापोरा इथल्या सैन्याच्या तळावर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली आहे. काल रात्री दहशतवाद्यांनी पुलवामामधील काकापोरामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार करत ग्रेनेडने हल्ला केला.
भारतीय जवानांनी देखील या हल्ल्याला चोख उत्तर दिलं. मात्र, तरीही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. सध्या या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सैन्याकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, रविवारी पाकिस्तानी लष्कराकडून राजौरी आणि पुँछ भागात जोरदार गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये एका कॅप्टनसह ४ जवान शहीद झाले. या सर्व परिस्थितीमुळे राजौरी येथील प्रशासनाने नियंत्रण रेषेच्या जवळील 84 शाळा तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
काश्मीरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा मिसाईलनं हल्ला, कॅप्टनसह ४ जवान शहीद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)