Spotify Layoffs : मंदीचा फटका! अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्टनंतर आता स्पॉटिफाई कंपनी करणार कर्मचारी कपात
Spotify Layoffs : म्युझिक स्ट्रीमिंगमधील दिग्गज कंपनी स्पॉटिफाई टेक्नोलॉजी (Spotify Technology ) कर्मचारी कपात करणार आहे. खर्च कमी करण्यासाठी ही कपात करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले.
Spotify Layoffs : जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची ( Recession ) गडद छाया तयार झाली आहे. आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरूवात झाली आहे. 2023 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. आता म्युझिक स्ट्रीमिंगची दिग्गज कंपनी स्पॉटिफाई टेक्नोलॉजी (Spotify Technology) देखील कर्मचारी कपात करणार आहे. Spotify टेक्नॉलॉजी कंपनी जवळपास 6 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीमागचं कारण कंपनीने खर्चात कपात सुरू असल्याचे सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर सहा टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच जवळपास 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा करताना कंपनीचे सीईओ डॅनियल एक यांनी सांगितले की, आम्ही कंपनीतील आमच्या जवळपास 6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करत आहोत. यासाठी मी पूर्ण जबाबदारी घेतो. कंपनीमध्ये सध्या 9,800 पूर्णवेळ कर्मचारी आहेत, अशी माहिती Spotify कंपनीने दिली आहे.
Recession : अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात
ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Spotify ही जगातील काही आघाडीच्या कंपन्यांमध्ये सहभागी झाली आहे. परंतु, खर्च कमी करण्याचे कारण देत ही कंपनी आता कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. यापूर्वी अल्फाबेट, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुक या कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. या टेक कंपन्यांनी गेल्या वर्षापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे.
Recession : मंदीचा परीणाम
कोरोना महामारीच्या काळात कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यावेळी देखील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खर्च कमी करण्याचे कारण देत अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. यात जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. 2023 मधील मंदीच्या भीतीमुळे कंपन्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेत आहेत असे बोलले जात आहे.
Recession : आतापर्यंत 15,3110 कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून 15,3110 तांत्रिक कर्मचार्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 51.489 पर्यंत वाढले आहे. Meta, Twitter, Oracle, Navida, Snap, Uber इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये काम बंद केले आहे. या पुढे देखील जगभरातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या