एक्स्प्लोर

मंदीचा फटका!  गोल्डमन सॅच कंपनी 3,200 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत 

Recession : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅच ग्रुप इंकने यावेळी हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूक बँकिंग विभागात जास्तीत जास्त कपात केली जाईल.

Goldman Sachs : जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची ( Recession ) गडद छाया तयार झाली आहे. आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरूवात झालीय. 2023 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. आता या यादीत अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅच ग्रुप इंकचेही (Goldman Sachs) नाव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक कंपनी 3,200 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. ही कंपनी बुधवारपासूनच कामगारांच्या कपातीला सुरूवात करू शकते.  

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅच ग्रुप इंकने यावेळी हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूक बँकिंग विभागात जास्तीत जास्त कपात केली जाईल. आतापर्यंत कंपनीने या कपातीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती  दिलेली नाही. परंतु अहवालानुसार, कंपनी 3,200 लोकांना कामावरून काढून टाकू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या तिमाहीतील आकडेवारीनुसार कंपनीत एकूण 49,100 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीत बुधवारपासून 6.5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. आकडेवारीनुसार, गोल्डमन सॅचने कोरोना महामारीच्या काळात अनेक नवीन भरती केली होती. परंतु, मंदीचे सावट येण्याच्या शक्यतेने बँक आपल्या अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे.

या कंपन्या देखील कपात करून शकतात

गोल्डमन सॅच व्यतिरिक्त, Amazon, Google Layoffs आणि Microsoft सारख्या कंपन्या देखील पुन्हा एकदा मर्चारी कपात करण्याचा विचार करत आहेत. द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, कंपनी आपल्या किमान 6 टक्के कर्मचार्‍यांना कमी करू शकते. त्यामुळे किमान 11 हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि पगारावर रेटिंग लागू करून गुगल आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून 15,3110 तांत्रिक कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 51.489 पर्यंत वाढले आहे. Meta, Twitter, Oracle, Navida, Snap, Uber इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये काम बंद केले आहे. 

दरम्यान, मागील वर्षी देखील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. यावर्षीही देखील कंपन्यांना कर्मचारी कपात सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Layoff: यंदाच्या वर्षातील जगातील मोठी कर्मचारी कपात, 'या' कंपनीत 70 टक्के मनुष्यबळ कमी होणार! 

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget