एक्स्प्लोर

आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी!

काँग्रेसमधल्या राहुलयुगाचा शुभारंभ ज्या कार्यक्रमानं झाला, त्या कार्यक्रमाची ही काही खास क्षणचित्रं टिपलीयत आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी...थेट 24, अकबर रोडवरुन..

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या इतिहासातलं एक स्थित्यंतर आज पूर्ण झालं. सोनिया गांधींकडून या पक्षाची सूत्रं त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्याकडे आता आली आहेत. पक्षाच्या नेतृत्वबदलाचा हा सोहळा काँग्रेसनं अगदी जंगी थाटात पार पाडला. काँग्रेसमधल्या राहुलयुगाचा शुभारंभ ज्या कार्यक्रमानं झाला, त्या कार्यक्रमाची ही काही खास क्षणचित्रं टिपलीयत आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी...थेट 24, अकबर रोडवरुन.. 1. सोहळा राहुल गांधींच्या अध्यक्षपदाचा असला तरी या कार्यक्रमात मनं जिंकली ती सोनियांच्या भाषणानं. हे भाषण सर्वार्थानं काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनाची तार छेडणारं होतं. 19 वर्षे सांभाळलेलं अध्यक्षपद सोडताना त्यांच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ या भाषणात उतरला होता. शिवाय अतिशय पर्सनल टचही त्यात दिसत होता. 2. 20 वर्षापूर्वी काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाची सूत्रं स्वीकारताना आपण कसे घाबरलो होतो, हातपाय थरथरत होते हे त्यांनी सांगितलंच. पण राहुल माझा मुलगा आहे म्हणून मी त्यांचं कौतुक करणं बरं दिसणार नाही असं सांगत, त्यांनी गेल्या काही काळात राहुलवर मोठ्या प्रमाणात वैयक्तिक हल्ले झाले. पण या सगळ्यातून तो कणखर बनल्याचं सांगितलं. आपल्या मुलाला सतत पप्पू म्हणून हिणवलं जात असल्यावर एका आईला काय वाटत असेल हेही त्यांच्या भाषणातून व्यक्त झालं. आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी! 3.सोनियांचं भाषण सुरु झाल्यावर फटाक्यांची माळ सुरु झाली. या आवाजाचा त्रास झाल्यानं 70 वर्षाच्या सोनिया गांधींनी आपलं भाषण तीनवेळा थांबवलं. मी काय म्हणतेय हे मलाच ऐकू येत नाही असं म्हणत त्या या कर्कश आवाजावर आपली नापसंती व्यक्त करत होत्या. राहुल गांधींनी उठून त्यांना कानात काही सांगितल्यावर त्यांनी नंतर आपलं भाषण सलगपणे चालू ठेवलं. अर्थात त्यानंतर फटाक्यांचा आवाजही हळूहळू थांबला. आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी! 4.राहुल गांधींचं भाषण हे सुरुवातीला इंग्रजी, नंतर थोडा वेळ हिंदी आणि परत इंग्रजी असं झालं. ये थोडा साऊथ इंडिया के लोगों के लिए असं म्हणत त्यांनी इंग्रजीतून भाषण केलं. गुजरातच्या प्रचारात राहुल गांधींमधली उत्स्फूर्तता दिसली होती. आजही त्यांनी कागद न घेता भाषण केलं असतं तरी चाललं असतं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत होती. बाहेर जे फटाके वाजत होते, त्याचा संदर्भ घेत...आग लागली की ती विझवणं किती अवघड असतं हे पाहताय ना हा एवढा एकच उत्स्फूर्त टोला भाषणात होता. आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी!5. राहुल गांधी अध्यक्षपद स्वीकारताना खाली पहिल्या रांगेत प्रियंका गांधी आणि राँबर्ट वढेरा हे दोघेही उपस्थित होते. काल सोनियांनी निवृत्तीबद्दलचं विधान केल्यावर 2019 ला मग रायबरेलीमधून प्रियंका गांधी लढणार का अशी अटकळ सुरु झाली होती. पण काही माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता बिलकुल फेटाळून लावली. सोनिया गांधी याच राबयरेलीमधून लढतील असं त्यांनी स्पष्ट केलं. 6. 24 अकबर रोडवरच्या या कार्यक्रमात प्रवेश करताना अनेक बड्या नेत्यांना मुख्य दरवाजानं प्रवेश करता आला नाही. आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यासारख्या बड्या नेत्यांचे कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेटारेटीत हाल झाले. मीडियाचे कॅमेरा ट्रायपॉड पालथे घालत, लावलेले पोस्टर तुडवत वाट काढण्याची वेळ गर्दीमुळे एका क्षणी आली होती. अशा विस्कळीत आयोजनाबद्दल वर्षानुवर्षे काँग्रेस कव्हर करणारे पत्रकार नाराजी व्यक्त करत होते. असल्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये भाजपकडून काही गोष्टी शिकायला पाहिजेत असा तिरकस टोलाही काहींनी लगावला. आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी! 7. काँग्रेस मुख्यालयाकडे येण्यासाठी अकबर रोडवरचा जो रस्ता आहे तो एका सर्कलपाशीच अडवण्यात आला होता. त्यामुळे चारचाकी वाहनांना त्याच्या आत प्रवेश नव्हता. देशाचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यासह माजी मुख्यमंत्री हरीश रावतसारखे अनेक दिग्गज नेते त्यामुळे अगदी पायी चालत हे अंतर कापताना दिसत होते. यहां पर तो एकही राजा, बाकी सब प्रजा है अशी एका बंदोबस्तावरच्या पोलिसाची मार्मिक प्रतिक्रिया होती. 8.इंदिरा आणि राजीव गांधी यांचे पोस्टर असलेल्या काँग्रेस मुख्यालयाच्या हिरवळीवर स्टेज उभारण्यात आलं होतं.  व्यासपीठावर सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी, खजिनदार मोतीलाल व्होरा, निवडणूक अधिकारी पुरामल्ली रामचंद्रन असे मोजकेच नेते उपस्थित होते. त्यातही सोनियांना भाषणावेळी फटाक्याचा त्रास होतोय म्हटल्यावर स्वत: जनार्दन द्विवेदी आपल्या कार्यकर्त्यांना आवरायला खाली उतरले. बराच काळ त्यांची खुर्ची रिकामीच दिसत होती. आय कान्ट स्पीक.., सोनियांचं भाषण आणि 24 अकबर रोडवरील 11 घडामोडी! 9.देशविदेशातून आणलेल्या सांस्कृतिक पथकांमुळे काँग्रेस मुख्यालयाबाहेर मिनी इंडियाचा फील येत होता. झारखंडमधल्या आदिवासींचं पारंपरिक नृत्य, हैदराबादमधल्या मुस्लिमांचा मर्फा, राजस्थानी वाद्यवृंद अशी सगळी विविधता या ठिकाणी बोलावण्यात आली होती. विशेष म्हणजे मुख्यालयाबाहेर उभारलेल्या एका छोट्या स्टेजवर वाराणसीतल्या गंगाआरतीप्रमाणे धूप, यज्ञ करुन आरतीही सुरु होती. काँग्रेसला सॉफ्ट हिंदुत्वाचं महत्व आता समजू लागल्याचं त्यातून दिसत होतं. 10.अध्यक्षपदाचा हा सोहळा संपल्यावर व्यासपीठावरचा एक क्षण अगदी खास ठरला. जेव्हा राहुल गांधींनी आपल्या आईप्रती कृतज्ञता दाखवत त्यांचं मायेनं कपाळावर चुंबन घेतलं. हा अतिशय हळूवार, भावनिक क्षण लेन्समध्ये टिपण्यासाठी अनेक कॅमेरे सरसावलेले. Rahul Gandhi, Sonia Gandhi 11. 2014 साली काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतर पहिल्यांदाच इतकी रौनक काँग्रेस मुख्यालयाबाहेर पाहायला मिळत होती. मुख्यालयाबाहेरचा रस्ता राहुल गांधींच्या अभिनंदनपर पोस्टर्सनी भरुन गेलाय. काही पोस्टर्समध्ये राहुल यांना ENERGY FOR INDIA म्हणून तर काही पोस्टर्समध्ये 'आज का अभिमन्यू' असं लिहिलेलं होतं. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या काळात अशा सेलिब्रेशनची संधी काँग्रेसजनांना मिळत राहणार हा फक्त प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget