एक्स्प्लोर
उरीमध्ये काही तरी चुकलंच, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांची अप्रत्यक्ष कबुली

नवी दिल्ली : उरीतील लष्करी तळाच्या सुरक्षेसंदर्भात काही तरी चूक झाली, अशी अप्रत्यक्ष कबुली देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र, पुन्हा अशी चूक होणार नाही यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही पर्रिकरांनी दिलं. उरीमधील हल्ला हा पाक पुरस्कृतच होता, हे भारताने पुन्हा एकदा खडसावून सांगितलं. भारताचे परराष्ट्र खात्याचे सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना समन्स बजावून पाकिस्तानविरोधातले सर्व पुरावे दिले आहेत. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली जीपीएस यंत्रणा पाकिस्तानच्या संपर्कात असल्याचा सबळ पुरावा पाकिस्तनला देण्यात आला आहे. तसंच पाकिस्तानकडून दहशवाद्यांना पुरवण्यात येणारी रसद थांबवावी अशी ताकीदही दिली.
आणखी वाचा























