एक्स्प्लोर

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे.

पासपोर्टसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भराल? पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. www.passport.gov.in वर जाऊन सर्वात आधी नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी वैध इमेल आयडी, मोबाईल नंबर देणं गरजेचं आहे. पासपोर्टसाठी वेबसाईटवर अकाऊंट बनवल्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन डेटा एन्ट्री ऑनलाईन डेटा अपलोड करुन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे. कारण फॉर्म भरताना नेट बंद झाल्यास तुम्हाला संपूर्ण फॉर्म पुन्हा भरावा लागेल. ऑफलाईन डेटा एन्ट्री ऑफलाईन ऑर्म भरण्यासाठी वेबसाईटवर वेगळा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय निवडल्यास एक पीडीएफ फाईल डाऊनलोड होते. ऑफलाईन डेटा पीडीएफमध्ये भरुन सेव्ह केल्यावर एक्सएमएल फाईल तयार होते, जी अपलोड केल्यावर आपला डेटा वेबसाईटवर अपलोड होतो. व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
सध्याच्या वास्तव्याची कागदपत्रं
1 पाणीपट्टीची पावती
2 फोन बिल
3 वीज बिल
4 इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
5 मतदान ओळखपत्र
6 गॅस कनेक्शन
7 प्रतिष्ठित कंपनीच्या लेटरहेडवरील एम्प्लोयमेंट लेटर
8 पती किंवा पत्नीच्या पासपोर्टची झेरॉक्स (त्यावरील पत्ता एकच असणं आवश्यक)
9 अल्पवयीन मुलांसाठी पालकांच्या पासपोर्टच्या शेवटच्या पानाची झेरॉक्स
10 आधार कार्ड
11 रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट
12 फोटो पासबुक (राष्ट्रीयीकृत बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, आणि प्रादेशिक ग्रामीण बँका)
  व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स
वयाची माहिती देणारी कागदपत्रं
1 जन्माचा दाखला
2 शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफरन्स सर्टिफिकेट
3 एलआयसी बॉण्ड
4 सरकारी कर्मचारी असल्यास सर्व्हिस रेकॉर्ड
5 आधार कार्ड
6 मतदान ओळखपत्र
7 पॅन कार्ड
8 ड्रायव्हिंग लायसन्स
9 अनाथ असल्यास अनाथालयाच्या लेटरहेडवर जन्मतारखेचा उल्लेख असलेलं पत्र
  पासपोर्टसाठी दोन प्रकार देण्यात आले आहेत इसीआर आणि नॉन इसीआर म्हणजेच इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड आणि इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड दहावीपर्यंत शिक्षण झालेल्यांना इसीआर प्रकारातून अर्ज करावा लागतो तर नॉन इसीआर साठी दहावीनंतरचं बारावी किंवा पदवीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. इसीआर प्रकारातील पासपोर्ट धारकांना परदेशात गेल्यावर इमिग्रेशन चेक करावं लागतं, तर नॉन इसीआर प्रकारातील पासपोर्ट धारकांना इमिग्रेशन चेकची आवश्यकता नसते. फॉर्म भरताना तुमचा कायमचा पत्ता आणि गेल्या वर्षभरापासूनचा पत्ता देणं बंधनकारक आहे. कारण या ठिकाणी पोलीस जाऊन पडताळणी करतात. जर तुमचा पत्ता चुकीचा असेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड आणि पुन्हा पासपोर्टसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज भरताना शक्यतो आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरील माहिती भरा. जी पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळली जाते. पासपोर्टसाठी दोन प्रकारे अर्ज दाखल करता येतो. साधारण आणि तात्काळ पासपोर्टसाठीचं शुल्क सामान्य 36 पानी पासपोर्ट 1500 रुपये 60 पानी पासपोर्ट 2000 रुपये तात्काळ 36 पानी पासपोर्ट 3500 रुपये 60 पानी पासपोर्ट 4000 रुपये हे शुल्क ऑनलाईन किंवा स्टेट बँकेच्या चलनाद्वारे भरता येतं. शुल्क भरल्यानंतर तुम्ही निवडलेल्या पासपोर्ट केंद्रासाठी तुम्ही अपॉईंटमेंट घेऊ शकता. एकदा शुल्क भरल्यानंतर त्यावर फक्त तीन वेळाच तुम्ही तुमची अपॉईंटमेंट शेड्यूल करु शकता. त्यानंतर पुन्हा शुल्क भरुन नोंदणी करावी लागते. पासपोर्ट सेवा केंद्रात काय केलं जातं? ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अपॉईंटमेंट मिळालेल्या दिवशी ठरलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात दिलेल्या वेळेतच जावं लागतं. आवश्यक कागदपत्र असल्याची खातरजमा केल्यानंतरच तुम्हाला आत सोडलं जातं. आत पुरेशी कागदपत्र असल्याची पडताळणी करुन तुम्हाला टोकन दिलं जातं. हे टोकन तुमची ओळख असतं. कारण त्या केंद्रात टोकनवरुनच तुमचं काम कधी होणार हे कळत असतं आणि तुमची फाईल पुढे सरकत असते. काऊंटर पहिलं या काऊंटरवर तुमची कागदपत्र पाहिली जातात. तुम्ही भरलेल्या अर्जाप्रमाणे सर्व कागदपत्र आहेत का याची पडताळणी या काऊंटरवर होते. इथेच तुमचा फोटो आणि तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. अर्जात नको असलेला मजकूर या ठिकाणी काढला जातो. उदा, पत्त्यातील एखादा मजकूर तुमच्या कागदपत्रांमध्ये नसेल. काऊंटर दुसरं या काऊंटरवर आपल्याला भेटतात ते पासपोर्ट अधिकारी. हे अधिकारी परराष्ट्र खात्याचे कर्मचारी असतात. तुमचा पासपोर्ट रोखण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे आपण जाताना आवश्यक कागदपत्र नेणं गरजेचं आहे. या काऊंटरवर तुमची कागदपत्र बारकाईनं तपासली जातात. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. जसे की पासपोर्ट का हवाय, काय करता, कुठे राहता वगैरे तुम्ही दिलेल्या कागदपत्रांनी पासपोर्ट अधिकाऱ्यांचं समाधान न झाल्यास ते अन्य कागदपत्रांची मागणी करु शकतात. सर्व पडताळणीनंतरच तुमची फाईल पुढच्या काऊंटरकडे सरकवली जाते. काऊंटर तिसरं हे सर्वात महत्त्वाचं काऊंटर आहे. या काऊंटरवर वरिष्ठ अधिकारी असतात. जे तुमच्या अर्जाची पुन्हा छाननी करतात. तुमची कागदपत्र तपासतात. सारं काही सुरळीत पार पडलं तर शेवटी तुम्हाला तुमचा अर्ज अप्रुव्ह झाल्याची पोचपावती याच काऊंटरवर जनरेट केली जाते. जर काही त्रुटी राहिली तर तुम्हाला पुन्हा अपॉईंटमेंट घ्यावी लागते, जी एकदा शुल्क भरल्यावर तीन वेळाच घेता येते. पासपोर्टसाठी कसं होतं पोलीस व्हेरिफिकेशन? पासपोर्टसाठी अर्ज दाखल केल्यानंतर निवडलेल्या पासपोर्ट केंद्रात अपॉईंटमेंट घ्यावी लागते. या केंद्रावर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. तुमच्या कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास त्याची पोच तुम्हाला लगेच मिळते. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज पोलीस व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जातो. एका आठवड्याभरात तुमची माहिती तुमच्या जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पाठवला जातो. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात एक विशेष अधिकारी या सर्व गोष्टींची पडताळणी करतो. ग्रामीण भागात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन आपली कागदपत्र अर्जदाराला घ्यावी लागतात आणि आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी लागतात. शहरी भागात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातून ही कागदपत्र तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं जातं. जिथून तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं. तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचा अर्ज आणि तुमची माहिती आल्यावर 5 दिवसांमध्ये व्हेरिफिकेशन अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देणं बंधनकारक असतं. पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये प्रामुख्याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही ना? तसंच तुम्ही दिलेल्या पत्त्यावर राहता की अन्य कुठे? तुम्हाला तुमच्या गावात लोक ओळखतात का? तुमचं गावातील एकंदर वर्तन या साऱ्या गोष्टींची पडताळणी केली जाते.  हा सर्व रिपोर्ट टाईप करुन त्यावर तुम्हाला ओळखणाऱ्या दोन साक्षीदारांची सही घेतली जाते आणि हा अर्ज अधीक्षक कार्यालयाला पाठवला जातो. जर स्थानिक पोलिसांनी तुमच्या क्लिअर रिपोर्ट दिला तर तुमची माहिती अधीक्षक कार्यालयामार्फत पासपोर्ट कार्यालयाला कळवली जाते. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट जारी केला जातो. मात्र जर स्थानिक पोलिसांनी तुमचा क्लिअर रिपोर्ट दिला नाही, तर तुमचा अर्ज बाद केला जातो. तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर 5000 रुपये दंड आणि पुन्हा पासपोर्ट शुल्क भरावे लागते. तसंच पुन्हा अचूक स्वरुपात अर्ज भरावा लागतो. यावेळी मात्र तुमची कसून तपासणी केली जाते. पाहा व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget