हेमा मालिनींचा आम्ही आदर करतो, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रीया
अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या विषयी केल्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली आहे. त्यांतर आता शिवसेना खासदार संजय राऊन त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांबाबत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शिवाय गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. परंतु, आता शिवसेना खासदार संजय राऊन (Sanjay Raut) त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे.
"अशा प्रकारची वक्तव्य यापूर्वीही अनेक वेळा करण्यात आली आहेत. यापूर्वी लालू यादव यांनीही असेच उदाहरण दिले होते. हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे याकडे नकारात्मकतेने पाहू नका." अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी एएनआय ( ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. अनेक राजकीय नेत्यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माफी मागितली होती. या प्रकरणी जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपलीही प्रतिक्रीया दिली आहे. "एखाद्या मंत्र्याला हे बोलणं शोभत नाही." अशी प्रतिक्रीया हेमा मालिनी यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत गुलाबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे फटकेबाजी केली. पण यावेळी त्यांची जीभ घसरली. आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केले आहेत, हे सांगताना त्यांनी रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. "गेली 30 वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.
गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळं त्यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका सुरु झाली. याचपार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलंय. भाषणातील माझ्या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
एखाद्या मंत्र्याला हे बोलणं शोभत नाही, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रीया
Gulabrao Patil Apologized: 'गुलाबी गालांबद्दलचं 'ते' वक्तव्य भोवलं, गुलाबराव पाटील यांनी मागितली माफी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
