एक्स्प्लोर
Advertisement
केरळमध्ये पवारांची एण्ट्री, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी
तिरुअनंतपूरम : डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एण्ट्री केली आहे. पवारांच्या दोन शिलेदारांनी केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.
केरळ निकाल - डावी आघाडी+: 85, काँग्रेस+: 46, भाजप+: 1, अन्य: 8
कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी 4891 मतांनी विजय मिळवला आहे. चांडी यांनी काँग्रेस उमेदवार अडव्होकेट जेकब इब्राहम यांचा पराभव केला. दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए के ससींद्रन यांनीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल 29057 मतांनी पराभव केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने केरळमध्ये खातं उघडलं आहे. केरळमध्ये डाव्यांची सत्ता दुसरकीडे केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड दिली आहे. 140 जागांच्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे. इथे डाव्या आघाडीने 81 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसला 50 जागांवर आघाडी मिळवता आली. दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे. आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. संबंधित बातम्याकेरळमध्ये मुख्यमंत्री चांडींना भारी पडली 'सोलर लेडी'?
हिमांता बिस्वा सरमा – आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार? ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
पुणे
निवडणूक
Advertisement