एक्स्प्लोर
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचे मोबाईल जप्त करा : हायकोर्ट
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल जप्त करण्याचे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी कारवाई.

नैनीताल : रस्ते सुरक्षेविषयक जागरुकतेसाठी वाहतूक विभाग आणि सरकार विविध उपक्रम सातत्यानं राबवत असतात. मात्र वाहन चालकांकडून त्याकडे सातत्याने कानाडोळा केला जातो. गाडी चालवताना फोनवर बोलताना झालेल्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे. हीच बाब लक्षात घेत गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल जप्त करण्याचे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहन चालकांचा मोबाईल किमान 24 तासांसाठी जप्त करण्याचे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. मोबाईलवर बोलत गाडी चालवणारे वाहन चालक इतरांचा जीवही धोक्यात टाकत असतात. अशा वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर मोबाईल जप्तीची कारवाई करण्यास हायकोर्टाने सांगितले आहे. दंडाची पावती फाडल्यानंतर मोबाईल जप्तीची कारवाई करण्याचे आदेश उत्तराखंड हायकोर्टाचे न्यायाधीश राजीव शर्मा यांनी राज्य परिवहन विभागाला दिले आहेत. जून महिन्यातही उत्तराखंड हायकोर्टाने गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांकडून 5 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले होते. तसेच राज्य सरकारला राज्यातील सर्व रस्त्यांचे एका महिन्यात सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. उत्तराखंडमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकांचे मोबाईल किमान एक दिवसासाठी तरी जप्त करा, असे निर्देश उत्तराखंड हायकोर्टाने दिले आहेत. राज्यातील सर्व रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडीटही करावे, असे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. वाहतुकीच्या कायद्यांबाबत अंमलबजाणीसाठी पथक नेमण्यास हायकोर्टाने सागंतले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























