School In Desert: रखरखत्या वाळवंटातील या शाळेला फॅन वा एसीची गरज नाही उन्हातही शाळा राहते गारेगार; जाणून घ्या कसं ते
Cool School In Desert : भारतातील थर वाळवंटात एका प्रसिद्ध अमेरिकन आर्किटेक्टने (New York Studio Architect Diana Kellogg यांनी) शाळा डिझाईन केली आहे.
School In Rajsthan : राजस्थानातल्या वाळवंटात मध्यभागी 'राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल' (Rajkumari Ratnavati Girls School) शाळेची इमारत उभारलेली असून ही इमारत अंडाकृती आकाराची आहे. न्यूयॉर्कच्या डायना केलॉग (New York Architect Diana Kellogg) यांनी डिझाइन केलेली ही एक नवीन शाळा आहे. या शाळेच्या इमारतीचा आकार आणि संदर्भ 'स्त्रीत्वाची आणि अनंताची शक्ती' दर्शवतो असे केलॉग यांनी सांगितले. ही शाळा लवकरच शाश्वत आर्किटेक्चरचा एक मोठा भाग म्हणजेच ज्ञान केंद्र होणार आहे असेही त्यांनी सांगितले. ही शाळा हाताने कोरलेली असून पिवळ्या वाळूच्या दगडांपासून बनवलेली आहे. शाळेत जाणार्या अनेक मुलींच्या कुटुंबांनी या बांधकामात मदत केली होती. या बांधकामासाठी केवळ स्थानिक मजुरांचा वापर केला गेला आहे.
या शाळेतील फर्निचर हे रोझवूडपासून बनवले गेले आहे.तसेच विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याकरीता पारंपारिक हातांनी शिवलेल्या आसनांचा वापर केला गेला आहे. एका वर्गाचे क्षेत्रफळ एवढे मोठे आहे की ,या ठिकाणी हवा खेळती राहते. त्याचबरोबर येथील स्थानिक प्राचीन पाणी साठवण तंत्रे (Local Ancient Water Harvesting Techniques) पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करतात आणि पाण्याचा पुनर्वापर (Recycle Gray Water) करतात. या शाळेमध्ये कला प्रदर्शनाची आणि सादरीकरणाची जागा आहे. यामध्ये लायब्ररी आणि द विमेन्स कोऑपरेटिव्ह यांचादेखील समावेश आहे. येथे स्थानिक कारागिर या प्रदेशातील महिलांना विणकाम आणि भरतकामाचे तंत्र शिकवले जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेश भारतीय फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) यांनी तयार केले आहेत. या शाळेत सध्याला 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. CITTA या ना-नफा संस्थेने हा प्रकल्प सुरू केला होता.
जैसलमेरच्या राजकुमारी रत्नावती कन्या शाळेतील मुलींसाठी सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केला गणवेश
फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांचे भारतीय उद्योगात विशेष स्थान आहे.त्यांनी जैसलमेरच्या राजकुमारी रत्नावती कन्या शाळेतील मुलींसाठी गणवेश डिझाइन केले आहेत. अतिशय अनोख्या पद्धतीने हे गणवेश त्यांनी तयार केले आहेत.सब्यसाचीने या गणवेशांना 'अजरख' असे नाव दिले आहे. हा गणवेश एक गुडघ्यापर्यंतचा फ्रॉक आहे ज्यामध्ये गोलाकार मान आणि हाफ स्लिव्ज असलेले मरून लेगीन आहे. यात दोन पॅच पॉकेट्स देखील आहेत. अजराख हा ब्लॉक प्रिंटिंग असलेल्या कापडाचा एक प्रकार आहे. राजस्थान आणि गुजरातमधील लोक याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI