एक्स्प्लोर
Advertisement
माझा इशारा सर्व राजकीय पक्षांना होता : लक्ष्मीकांत देशमुख
‘सगळेच पक्ष नाही रे वर्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे राजा तू चुकत आहेस असं म्हणताना माझा इशारा सर्व राजकीय पक्षांना आणि व्यवस्थेकडे होता.’
बडोदा : ‘सगळेच पक्ष नाही रे वर्गाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे राजा तू चुकत आहेस असं म्हणताना माझा इशारा सर्व राजकीय पक्षांना आणि व्यवस्थेकडे होता.’ असं स्पष्टीकरण 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलं आहे. साहित्य संमेलनात उद्घाटनासमयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, आज (रविवार) बडोद्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
‘नाही रे या वर्गाकडे सर्वच पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आज बेरोजगारीमुळे तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे. दुसरीकडे दलित आणि मुस्लिम समाजही नाराज आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मतांचं राजकारण न करता या सर्व घटकांकडे लक्ष देण्याचं गरज आहे.’ असं स्पष्टीकरण यावेळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिलं.
राजा तू चुकत आहे!
'देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून पुरस्कारवापसीचा मार्ग काही लेखकांनी स्वीकारला. त्यामागील त्यांची भूमिका शासनानं मोठ्या मनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवं. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. तुम्ही या अर्थाने लोकशाहीचं तत्त्व पाळत नाही आहात. म्हणून मी असं म्हणण्याचं धाडस करतो की राजा तू चुकत आहे! तू सुधारलं पाहिजे.' असं लक्ष्मीकांत देशमुख हे आपल्या भाषणात म्हणाले होते.
'राष्ट्रवादाच्या नावाखाली काही जणांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. काहींच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेतली जात आहे. गांधीजींच्या वचनांचा आधार देत ते म्हणतात, देशभक्ती व राष्ट्रवाद आणि माणसुकी-मानवता वेगवेगळ्या नाहीत. म्हणून राष्ट्रवादी हा सर्वसमावेशक असतो. तो कुणा गट, पक्ष, वंशाला वगळत नाही. आज याविरुद्ध घडताना दिसत आहे. म्हणून माझी चिंता मी या मंचावरुन व्यक्त करीत आहे. समझनेवालों को इशारा काफी है' असं लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement