संजू सॅमसनने रचला इतिहास, विराट कोहलीची बरोबरी, T-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना होत आहे.आज संजू सॅमसनच्या खेळीनं सर्वाचं लक्ष वेधलं त्याने 89 धावांची खेळी केली. या खेळीमुळं त्याने मोठा इतिहास रचला आहे.
Ind vs Nz Final Sanju Samson Stats T20 World Cup : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारतानं बलाढ्य असा 255 धावांचा डोंगर उभा केला आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे यांनी वादळी खेळी केली आहे. दरम्यान, आज संजू सॅमसनच्या खेळीनं सर्वाचं लक्ष वेधलं त्याने 89 धावांची खेळी केली. या खेळीमुळं त्याने मोठा इतिहास रचला आहे. विराट कोहलीशी बरोबरी केली आहे.
अभिषेक शर्मानंतर, संजू सॅमसनने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात इतिहास रचला. सॅमसनने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 50 धावा करून एक अनोखा विक्रम रचला. टी-२० विश्वचषकात सलग तीन डावात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी विराट कोहलीसह दोन भारतीयांनी ही कामगिरी केली आहे.
संजू सॅमसनने इतिहास रचला
टी-२० विश्वचषकात सलग तीन डावात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा संजू सॅमसन जगातील सातवा आणि भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी विराट कोहली आणि केएल राहुल होते. सॅमसनची मालिका वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात 97 धावांच्या खेळीने सुरू झाली. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मौल्यवान 89 धावा केल्या. आता, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात आणखी 89 धावा केल्या आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील अंतिम सामन्यात सर्वोच्च 255 ही धावसंख्या उभारली.
सलग तीन विश्वचषकातील सामन्यात 50+ धावा करणारे खेळाडू
आतापर्यंत, जगात फक्त सात फलंदाज आहेत ज्यांनी टी-20 विश्वचषकात सलग तीन डावात पन्नास किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या सात फलंदाजांमध्ये विराट कोहली, महेला जयवर्धने, बाबर आझम, केएल राहुल, कुसल मेंडिस, साहिबजादा फरहान यांचा समावेश आहे आणि आता संजू सॅमसननेही ही कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने 2016-2021 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने सलग तीन डावांमध्ये 50 + धावा केल्या. 2016 च्या टी 20 विश्वचषकातील त्याच्या शेवटच्या दोन डावांमध्ये विराट कोहलीने 82 आणि 89 धावा केल्या. तो दोन्ही डावांमध्ये नाबाद राहिला. त्यानंतर, 2021 च्या विश्वचषकात, विराटने त्याच्या पहिल्या डावात 57 धावा केल्या. विराटच्या बॅटमधून सलग तीन विश्वचषक अर्धशतकांपैकी हे पहिलेच होते.



















