कोणत्या संघाने आत्तापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला? न्यूझीलंडची कामगिरी कशी? जाणून घ्या सविस्तर माहिती
टी20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाला होता. यावर्षी विश्वचषकाचे 10 वे पर्व आहे. कोणत्या संघाने विश्वचषक विजेतेपद किते वेळा जिंकले याची माहिता पाहुयात.
All Teams T20 World Cup Winners List : 7 फेब्रुवारी रोजी 2026 चा टी 20 विश्वचषक सुरु झाला आहे. आता, एका महिन्याच्या उत्साहानंतर, आज अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडियावर त्यांच्या घरच्या चाहत्यांसमोर ट्रॉफी जिंकण्याचे दबाव असणार आहे. भारतीय संघाने किवींविरुद्ध कधीही टी20 विश्वचषक जिंकलेला नाही.
टी20 विश्वचषक 2007 मध्ये सुरु झाला होता. यावर्षी विश्वचषकाचे 10 वे पर्व आहे. कोणत्या संघाने विश्वचषक विजेतेपद किते वेळा जिंकले. .
टी२० विश्वचषक कधी आणि कोणी जिंकला?
2007 - भारत
2009 - पाकिस्तान
2010 - इंग्लंड
2012 - वेस्ट इंडिज
2014 - श्रीलंका
2016 - वेस्ट इंडिज
2021 - ऑस्ट्रेलिया
2022- इंग्लंड
2024- भारत
2007 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला.
2009 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला.
2010 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला.
2012 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा 36 धावांनी पराभव केला.
2014 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा 6 गडी राखून पराभव केला.
2016 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला.
2021 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला.
2022 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला.
2024 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला.
या संघांनी दोनदा टी20 विश्वचषक जिंकला
इतिहासात, फक्त भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने दोनदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. कोणत्याही संघाने गतविजेता असताना त्यांचे जेतेपद राखले नाही. 2024 च्या विजयासह, भारताला सलग दोन टी20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ बनण्याची संधी आहे. न्यूझीलंडने कधीही टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली नाही.
सलग दुसरा टी20 विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाला मोठी संधी
2024 च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर यावेळी देखील भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला तर भारत नवीन विक्रम करणार आहे. सलग दोन टी20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ बनण्याची संधी भारताला मिळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. प्लेईंग 11 मध्ये भारतीय संघानं कोणताही बदल केलेला नाही.



















