एक्स्प्लोर
साध्वी प्रज्ञा यांच्याकडे 4 लाख रुपयांची संपत्ती, चांदीचं ताट, चार ग्लास आणि कमंडलू!
मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी त्यांच्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे.
![साध्वी प्रज्ञा यांच्याकडे 4 लाख रुपयांची संपत्ती, चांदीचं ताट, चार ग्लास आणि कमंडलू! sadhvi pragya singh thakur Assets and property details साध्वी प्रज्ञा यांच्याकडे 4 लाख रुपयांची संपत्ती, चांदीचं ताट, चार ग्लास आणि कमंडलू!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/22192458/Sadhvi-Pagya-singh-Thakur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज भाजपच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत प्रज्ञा ठाकूर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे जवळपास साडेचार लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे चांदीचे ताट, ग्लास, पेला आणि कमंडलू यासह सोन्याची चेन आणि अंगठी असल्याची माहिती दिली आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे चार लाख 44 हजार 224 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये 90 हजार रुपयांची रोकड आणि दोन बँक खात्यांमध्ये 88 हजार 824 आणि 11 हजार रुपये जमा आहेत. साध्वी यांचे कोणत्याही कंपनीत शेअर्स वगैरे नाहीत. तसेच त्यंच्याकडे गाडी किंवा जमीन नाही.
साध्वी यांच्याकडे 48 हजार रुपयांची एक सोन्याची चेन, 16 हजार रुपयांची अंगठी, 81 हजार रुपये किंमतीचे चांदीचे कमंडलू, तसेच चांदीची थाळी, चार चांदीचे ग्लास, एक चांदीचा पेला, पायातल्या चांदीच्या रिंग्स आणि श्रीरामाचे नाव लिहिलेली एक चांदीची प्लेट या सर्वांची किंमत मिळून 4 लाख 44 हजार 224 रुपये आहेत.
साध्वी प्रज्ञा यांनी आज मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरला. मंगळवारी त्या भाजप कार्यकर्त्यांसोबत शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)