एक्स्प्लोर
जीवन अनमोल आहे, हेल्मेट वापरा, सचिनचा दुचाकीस्वारांना सल्ला
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच आपल्या सामाजिक जाणिवेसाठी ओळखला जातो. खासदार आदर्श ग्राम योजना असो किंवा स्वच्छ भारत अभियान, सचिनने नेहमीच जनजागृतीसाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी हैदराबादमध्ये सचिनने दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला.
सचिनने त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिन आपल्या कारमधून हैदराबादमधील उप्पल रोडवरुन जात होता. त्यावेळी काही तरुणांना त्यानं दुचाकीवरुन विनाहेल्मेट जाताना पाहिलं. गाडीची काच खाली करुन सचिनने त्यांना जवळ बोलवलं.
साक्षात सचिनला पाहून दुचाकीस्वारही सेल्फी घेण्यासाठी सरसावले. मात्र सचिनने या दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचं आवाहन केलं. 'आयुष्य अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा, अशी सूचना सचिनने दिली.
https://twitter.com/sachin_rt/status/850940121088176129
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement