एक्स्प्लोर
Ram Mandir Bhumi Pujan : 'सियावर रामचंद्र की जय'... अखेर ऐतिहासिक राममंदिराचं भूमीपूजन संपन्न
अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली.
अयोध्या : अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.
बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली. पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. तर हनुमानगढीत त्याआधी त्यांनी पूजा केली. पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चाराच्या गजरात पूजाविधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
मोदी संबोधन करणार
काही वेळात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ पाच जणांच्या उपस्थितीत पंतप्रधान देशाला संबोधित करतील. या मुख्य भूमिपूजन सोहळ्या मंचावर केवळ पाच मान्यवर असतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित असतील.
काल गणेश पूजन संपन्न
प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल सकाळी या मंदिराच्या ठिकाणी गणेश पूजन पार पाडलं. सकाळी 9 वाजता सुरु झालेलं हे पूजन दुपारी 1 वाजता संपन्न झालं. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्यााआधी गणेशाची पूजा केली जाते त्याप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला. तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी मोजकेच पुजारी नेमण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत .
अयोध्येच्या नाक्या- नाक्यावर पोलिस तैनात
अयोध्यानगरी पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेद्र मोदी येण्याच्या एक दिवस आधी अयोध्येला लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. जे छोटे मोटे मार्ग आहेत त्याठिकाणी बॅरिकेटींग लाऊन तपासणी सुरु ठेवण्यात येणार आहे. अयोध्याच्या शेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपुर, अमेठी या शहरांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अयोध्येत शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश सराकरची जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतुक पोलिसांच्या तुकड्या रस्त्यारस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.
अयोध्येच्या लोकांमध्ये उत्साह
आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगीबेरंगी कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.
हे ही वाचा-
Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही
राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?
भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement